शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात गर्भपात प्रमाण चिंताजनक

By admin | Updated: March 27, 2016 02:54 IST

शहरात गर्भपाताचे प्रमाण वाढत असून, ही बाब चिंताजनक बनली आहे. वर्षाला सुमारे १३ हजार गर्भपात होत आहेत. महिलांच्या आरोग्यासह गर्भपात करण्यासाठीच्या कारणांकडे गांभीर्याने

पिंपरी : शहरात गर्भपाताचे प्रमाण वाढत असून, ही बाब चिंताजनक बनली आहे. वर्षाला सुमारे १३ हजार गर्भपात होत आहेत. महिलांच्या आरोग्यासह गर्भपात करण्यासाठीच्या कारणांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. गर्भपात करताना सबळ कारण सादर करणे आवश्यक असते. बाळाला धोका असणे, आईला धोका असणे, गर्भाशयाचा त्रास, लैंगिक अत्याचाराच्या घटनेतून झालेली गर्भधारणा अशावेळी वीस आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. महापालिका रुग्णालयासह शहरात इतरही अधिकृत गर्भपात केंद्र आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षभरात १३ हजार गर्भपाताची प्रकरणे घडली आहेत. गर्भपाताचे प्रमाण कमी होण्यासाठी महिलांच्या आरोग्यासह जनजागृतीकडेदेखील लक्ष देणे गरजेचे बनले आहे. गर्भवती मातेचा आहार, व्यायाम, मार्गदर्शन यासह उपचारही महत्त्वाचे आहेत. गर्भलिंग चाचणी करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. तरीही बेकायदारीत्या बाळाची लिंगचाचणी करून गर्भपात करण्याचे प्रकार घडत आहेत. वंशाचा दिवा हवा या अपेक्षेने गर्भपात केला जात असून, यामुळे एक कळी उमलण्याआधीच कोमेजून जाते, याचा गांभीर्याने विचार करायला हवा. गर्भपाताचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती आणि समाजप्रबोधन गरजेचे आहे. मुलाप्रमाणे मुलगीदेखील वंशाचा दिवा आहे. या साध्या गोष्टी समजल्यास गर्भपातासारखे प्रकार थांबण्यास मदत होऊ शकेल, असे मत व्यक्त केले जात आहे.(प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २०१३-१४ या आर्थिक वर्षात १३ हजार ६२० गर्भपात करण्यात आले, तर २०१४-१५ या आर्थिक वर्षात १३ हजार ३६३ गर्भपात झाले. दोन वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण तीनशेने घटले असले, तरी वर्षातील एकूण आकडा मोठा आहे. दरम्यान, या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतही ८ हजार ७०९ गर्भपात झाले. कायद्याने अथवा बेकायदारीत्या होत असलेले गर्भपाताचे प्रकार चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. कायदेशीररीत्या गर्भपात करतानाही त्याबाबतची रीतसर परवानगी हवी असते. त्यातच अधिकृत केंद्रातच गर्भपात करणे बंधनकारक आहे. नियमानुसार गर्भपात करताना तो कोठे करणार आहे, कोण करणार आहे, कशासाठी करणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती सादर करणे आवश्यक असते. त्यानंतरच गर्भपात करण्यास परवानगी मिळते. परवानगीशिवाय गर्भपात केल्यास तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.