शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळाली ८० लाखांची भरपाई

By admin | Updated: April 10, 2017 02:31 IST

जमिनीसाठी विकसन करारनामा करून बिल्डरने शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे आश्वासन दिले. मात्र बिल्डरने पैसे

पिंपरी : जमिनीसाठी विकसन करारनामा करून बिल्डरने शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे आश्वासन दिले. मात्र बिल्डरने पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला. कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर तडजोड करण्याची तयारी बिल्डरने दाखविल्यामुळे दिवाणी न्यायालयाचा दावा पहिल्याच तारखेला निकाली निघाला. महालोकअदालतमध्ये तडजोडीने निकाली काढण्यात आलेल्या या खटल्यात दहा शेतकऱ्यांना संबंधित बिल्डरकडून ८० लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.दिवाणी कोर्टात दाखल दावे निकाली निघण्यास अनेक वर्षे वाट पाहावी लागते, असे म्हटले जाते. संबंधित शेतकऱ्यांकडून दिवाणी कोर्टात दाखल दावा दोन्ही बाजूच्या पक्षकारांनी दाखविलेल्या सामंजस्यामुळे निकाली निघाला.२०१४ मध्ये मोशी येथील दहा शेतकऱ्यांची जमीन भागीदारीमध्ये असलेल्या दोन बिल्डर्सतर्फे विकसनासाठी घेण्यात आली होती. त्यासाठी त्यांना साठ लाख रुपये मोबदला देण्याचे ठरले होते. संबंधित जागेचा विकसन करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे देण्यात आले नाहीत. बिल्डरकडून पैसे मिळण्यास उशीर होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी विकसन करारनामा  आणि कुलमुखत्यारपत्र रद्द  करण्यात यावे म्हणून दावा दाखल केला होता. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी दावा दाखल केल्याचे समजल्यानंतर संबंधित बिल्डर्सकडून शेतकऱ्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यांचा हा दावा महालोकअदालतमध्ये निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आला होता. त्यांनी महालोकअदालत मधील पॅनेलपुढे पैसे देण्याची तयारी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांतर्फे एस. बी. पवार, ऋषीकेश पवार यांनी काम पाहिले. शेतकऱ्यांना ८० लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.