शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

दरमहा ४० हजार मानधन : मागणी मान्य न झाल्यास संप, रेशनिंग, केरोसीन विक्रेत्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 03:56 IST

राज्यातील हजारो रेशनिंग व केरोसीन विक्रेत्यांना प्रतिमहा ४० हजार रुपये मानधन सुरू करण्याचा ठराव रेशनिंग विक्रेत्यांच्या दोन्ही शिखर संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने मंजूर झाला.

पिंपरी : राज्यातील हजारो रेशनिंग व केरोसीन विक्रेत्यांना प्रतिमहा ४० हजार रुपये मानधन सुरू करण्याचा ठराव रेशनिंग विक्रेत्यांच्या दोन्ही शिखर संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. दोन महिन्यांत सरकारने या ठरावाची अंमलबजावणी न केल्यास दोन्ही संघटनांचे सभासद १ मे २०१८ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.राज्यभरातील रेशनिंग व केरोसीन विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणाºया आॅल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन आणि आॅल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघ या दोन शिखर संघटनांची संयुक्त राज्यस्तरीय बैठक आकुर्डीतील खंडोबा मंदिरातील सांस्कृतिक भवन येथे शनिवारी पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर आणि महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यभरातील ३५० जिल्हा व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.काकासाहेब देशमुख म्हणाले की, दोन्ही संघटनांमधील दुहीचा राज्य सरकारकडून गैरफायदा घेतला जात होता. मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर दोन्ही संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. सर्वांच्या भल्यासाठी आप-आपसातील मतभेद व गैरसमज बाजूला ठेवून आपण सर्व जण एकत्र येऊन सरकारला ताकद दाखवून आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू. एखाद्या कारणामुळे कंपनीतील कामगाराला नोकरी गमावावी लागल्यास, कंपनीकडून नुकसान भरपाई व इतर सामाजिक सुरक्षा फायदे त्याला आर्थिक स्वरूपात अदा केले जातात. मात्र, केरोसीनचा कोटा कमी झाल्याने राज्यभरातील पाच हजार केरोसीन विक्रेत्यांना याचा फटका बसला आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा अस्तित्वात असूनही राज्य सरकारकडून एक दमडीचीही नुकसान भरपाई दिलेली नाही. या केरोसीन विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना गॅस एजन्सी देण्याची मागणी आहे.विजय गुप्ता यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.गजानन बाबर म्हणाले की, यापूर्वी फेडरेशनच्या वतीने विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीन वेळा आंदोलन करण्यात आले. मात्र, दोन्ही संघटनांमधील दुहीचा गैरफायदा घेत राज्य सरकारने ही आंदोलने यशस्वी होऊ दिली नाही. त्यामुळे या दोन्ही संघटनांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता. संघटनांच्या एकत्र येण्यामुळे विक्रेत्यांचे प्रश्न सुटण्यास फारसा वेळ लागणार नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड