शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी माजी नगरसेवकासह ११ आरोपींना अटक

By admin | Updated: April 10, 2017 14:20 IST

सुहास बाबुराव हळदणकर याचा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खराळवाडी परिसरात तेथेच राहाणा-या आरोपींनी खून केला.

ऑनलाइन लोकमत 
पिंपरी, दि. 10 - घरकुल चिखली येथील कार्यकर्ता सुहास बाबुराव हळदणकर (वय ३२, रा. ) याचा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खराळवाडी परिसरात तेथेच राहाणा-या आरोपींनी खून केला. निवडणुकीतील वाद तसेच वैयक्तिक व्देषातून त्यांच्यात भांडण झाले. भांडणाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यात सुहासचा डोक्यात दगड मारून खून झाला. त्यामुळे रात्री या परिसरात तणावाचे वातावरण होते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून प्रकरणात प्रमुख आरोपी काळ्या उर्फ संदीप कलापुरे (वय ३०),प्रतुल घाडगे (वय ३६),अभिजीत कलापुरे (वय २८), माजी नगरसेवक सद्गुरू कदम (वय ४५),दत्ता उर्फ फेट्या कलापुरे(वय २५),संतोष उर्फ मुंड्या आरबेकर (वय ४०),प्रविण कदम उर्फ झिंगºया (वय २८),खंड्या उर्फ प्रविण सावंत (वय २६),गणेश जाधव (वय २५),छोटण पठाण (वय २८),संतोष उर्फ बाब्या कदम (वय २८),सतिश कदम (वय ३१) सर्व राहाणार खराळवाडी अशी आरोपींची नावे आहेत. या मध्ये काही आरोपी हे माजी नगरसेवकाचे जवळचे नातेवाईक आहेत. गणेश जाधव वगळता सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. 
 
ऋषीकेश बाळासाहेब काटे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमान चौक खराळवाडी येथे रात्री दहाच्या सुमारास काही कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यांच्यात चर्चा सुरू झाली. सुहास हळदणकर याच्यामुळे  काळ्या उर्फ संदीप कलापुरे याची नोकरी गेली. तसेच त्याने सद्गुरू कदम यांचे बंधू माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या विरोधातही फलेक्सबाजी केल्याचा मुद्दा हाणामारीसाठी कळीचा मुद्दा बनला.