‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘रिटा रिपोर्टर‘चे बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल फोटोशूट; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 11:25 AM2021-09-27T11:25:43+5:302021-09-27T11:34:34+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील रिटा रिपोर्टर अर्थात प्रिया अहुजा सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे, तिचे नवे बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल फोटोशूट

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील रिटा रिपोर्टर अर्थात प्रिया अहुजा सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे, तिचे नवे बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल फोटोशूट

होय, प्रियाने तिच्या नव्या फोटोशूटचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिच्या या हॉट लुकची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये.

फक्त शर्ट घालून प्रियाने हॉट पोज दिल्या आहेत. एका मुलाची आई असलेल्या प्रियाच्या या अदा पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

ह्यतारक मेहता का उल्टा चश्माह्णची रिटा रिपोर्टर अर्थात ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजाने तिच्या काही फोटोंमुळे ट्रोल झाली होती.

प्रियाने अलीकडे तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते आणि हे फोटो पाहून ट्रोलर्सने तिला ट्रोल करायला सुरूवात केली होती. या फोटोत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसली आणि अनेकांनी यावरून प्रियाला ट्रोल केले होते.

फोटोत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसली म्हणून लोकांनी प्रियाला नको ते ऐकवले. इतके की, लोकांच्या कमेंट वाचून तिचा पती मालव राजदाही संतापला होता.

यानंतर प्रियाने या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले होते.फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने ट्रोलर्सला चांगलेच फैलावर घेतले होते.

मी शेअर केलेल्या त्या फोटोत काहीही चुकीचे वा वादग्रस्त नव्हते. तरीही काही लोकांनी मला ट्रोल केले. नको त्या कमेंट्स केल्यात. पण या कमेंट्समुळे मला जराही फरक पडत नाही, असे ती म्हणाली होती. कोणत्याही सेलिब्रिटीची पोस्ट पटत नसेल तर थेट त्याला अनफॉलो करण्याचा सोपा मार्ग आहे. पटतं असेल तर थांबा नाही तर अनफॉलो करा, इतकं सोप्प काम आहे, असेही ट्रोलर्सला तिने सुनावले होते.