1 / 11ब्राइट पिंक:- ओठांना ठसठशीत गुलाबी रंगाची ( गडद) लिपस्टिक लावणं म्हणजे मोकळ्या मनानं, उत्साहानं उन्हाळ्याचं स्वागत करणं होय. मनातला उत्साह असा चेहऱ्यावरुन दिसण्यासाठी ब्राइट पिंक रंगाची लिपस्टिक निवडावी.2 / 11ऑरेंज रेड:- उन्हाळ्यातली संध्याकाळ विशेष आकर्षक असते. सूर्य मावळताना आकाशात पसरणारी नारिंगी लाली आपल्या शरीराभोवती ओढावी अशी इच्छा होतेच. त्यासाठीच ऑरेंज रेड या रंगाची लिपस्टिक वापरावी.3 / 11ब्लश पिंक:- लिपस्टिकचा ब्लश पिंक हा रंग ओठांना मऊपणाचा फील देतो. या रंगाची लिपस्टिक ओठांना लावल्यास ओठ भरपूरकाळ गुलाबीसर राहातात. ब्लश पिंक हा रंग ओठांवर आणखी आकर्षक दिसण्यासाठी मॅट फिनिशचा ब्लश पिंक हा रंग वापरावा.4 / 11साॅफ्ट पिच: साॅफ्ट पिच ही लिपस्टिकची छटा 'कबाना' नावानं ओळखली जाते. उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जातांना, सहलीला जातांना लिपस्टिकची ही शेड शोभून दिसते. उन्हाळ्यात दुपारी लिपस्टिकचा हा रंग ओठांवर शोभून दिसतो.5 / 11फ्लशी कोरल: उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेत, की कपटातले, मेकअप किटमधले भडक रंग दडवून् ठेवायची नाही तर ते मस्त अंगावर,चेहऱ्यावर खुलवायचे. उन्हाळ्याचा हा उत्साह साजरा करण्यासाठी भडक रंगाचा पोवळा रंग म्हणजेच फ्लशी कोरल रंगाची लिपस्टिक लावावी. फ्लशी कोरल या कलरच्या लिपस्टिकनं ओठ कोरडे होत नाही आणि रंग ओठांवर फुटतही नाही. या रंगाच्या लिपस्टिकमध्ये ह्यॅल्युरोनिक ॲसिडचा वापर केलेला असतो. त्यामुळे फ्लशी कोरलमुळे ओठ देखील ओलसर दिसतात.6 / 11पेल मोव्हे:- न्यूट्रल कलर टाळून 'कूल ' शेडची लिपस्टिक हवी असेल तर पेल मोव्हे ( फिकट जांभळी) लिपस्टिक लावावी. कोणत्याही प्रकारच्या स्किन टोनवर पेल मोव्हे शोभून दिसते. पेल मोव्हेत ओठांना ओलसर ठेवणारा घटक आणि ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. या लिपस्टिकनं ओठ हेल्दी दिसतात.7 / 11फायरी ॲप्रिकाॅट:- फायरी ॲप्रिकाॅट शेडची लिपस्टिक एकदा ओठांवरुन फिरवली तरी ओठांना एक हेल्दी चमक मिळते. फायरी ॲप्रिकाॅट आणखी आकर्षक दिसण्यासाठी टिंट प्रकारातली लिपस्टिक वापरावी.8 / 11साॅफ्ट कोरल:- पिंक ओठांवर लिपस्टिक रेशमासारखी रुळलेली दिसण्यासाठी ( चिटकलेली नाही) साॅफ्ट कोरल पिंक हा लिपस्टिकचा शेड वापरावा. फिकट पोवळा रंगाची लिपस्टिक लावून चेहरा मस्त उजळतो. लिपस्टिकमुळे चेहऱ्यावर येणारं तेज संपूर्ण दिवस टिकून राहातं.9 / 11पिची पिंक: पिची पिंकला लिपस्टिक शेडसमध्ये 'बॅड बाॅय ' म्हणून ओळखलं जातं. रासबेरी बियांच्या तेलाचा आणि डाळिंबाच्या अर्काचा एक्स्ट्रा ग्लाॅसी इफेक्ट या पिची पिंक लिपस्टिकमधून मिळतो. पिची पिंक लिपस्टिक लावून ओठ ओलसरही दिसतात.10 / 11ब्लड रेड:- ब्लड रेड शेडची लिपस्टिक सर्व सिझनमध्ये कायम इनच असते. ही लिपस्टिक कधीही लावली तरी आपण काही चूक केली असं वाटत नाही.11 / 11शिमरी रोज:- उन्हाळ्यातल्या दिवसात नेहमीपेक्षा जास्त मेकअप करण्याची इच्छा होतेच. आपण केलेला मेकअप उठून दिसण्याची तरतूद शिमरी रोज कलरची लिपस्टिक लावल्यास होते. उन्हाळ्यात विशेष प्रसंगी,विशिष्ट कार्यक्रमाल शिमरी रोज रंगाची लिपस्टिक आपल्या लूकला स्पेशल इफेक्ट देते.