शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शर्ट स्वच्छ पण कॉलर मळलेली? घ्या उपाय- १ मिनिटात कॉलर होईल स्वच्छ-फार कष्टही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2025 19:51 IST

1 / 6
पांढरे शर्ट वापरताना आणि धुताना खूप जपून राहावे लागते. कारण लगेच त्यांचा रंग खराब होतो. कधी पिवळट तर कधी मळकट दिसतो.
2 / 6
पण तरीही पांढऱ्या शर्टमध्ये खूप छान फॉर्मल लूक येत असल्याने अनेक जण ऑफिससाठी पांढरे शर्टच घालतात. शिवाय काही विद्यार्थ्यांचा युनिफॉर्मही पांढऱ्याच रंगाचा असतो.
3 / 6
पांढरे शर्ट धुतल्यानंतर बऱ्याचदा असं दिसतं की शर्ट तर स्वच्छ आहे, पण त्याची कॉलर मात्र अजूनही मळकट, कळकटच आहे.
4 / 6
म्हणूनच आता ही एक अतिशय सोपी ट्रिक पाहा आणि पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या शर्टची काॅलर कमीतकमी मेहनतीत आणि कमीतकमी वेळात अगदी चकाचक करा. त्यासाठी करा हा तुरटीचा उपाय एकदम सोपा.
5 / 6
तुरटीमध्ये असणारे एल्युमिनियम सल्फेट आणि पोटॅशियम सल्फेट कॉलरचा काळेपणा काढून टाकण्यास मदत करतात.
6 / 6
मळक्या डागांवर तुरटी लावा. यानंतर आता तुमचे नेहमीचे डिटर्जंट काॅलरवर टाका आणि कपडे घासण्याच्या ब्रशने कॉलर घासून काढा. अगदी स्वच्छ होऊन जाईल. करून बघा.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCleaning tipsस्वच्छता टिप्सHome remedyहोम रेमेडी