1 / 6मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानींचा फॅशन सेन्स अतिशय कमालीचा आहे, असं त्यांच्या बाबतीत नेहमीच म्हटलं जातं. त्यामुळेच तर कपडे असो किंवा मग दागिने असो.. त्यांचं सिलेक्शन खूपच खास असतं.2 / 6त्यांनी अतिशय चोखंदळपणे निवडलेल्या कपड्यांची आणि दागिन्यांची सुंदर झलक सध्या त्यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्याा विवाह सोहळ्यादरम्यान पाहायला मिळत आहे. लग्नानिमित्त होणाऱ्या सगळ्याच सोहळ्यांमध्ये नीता अंबानी अगदी उठून दिसत आहेत.3 / 6त्यांची चाॅईस जशी इतरांना आवडते, तशीच ती त्यांच्या लेकीला म्हणजेच इशा अंबानीलाही आवडते. म्हणूनच तर आजवर बऱ्याचदा इशाने आईचे दागिने अगदी हौशीने घातले आहेत.4 / 6अनंत आणि राधिका यांच्या हळदीचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी इशाने दाक्षिणात्य लूक केला होता. यावेळी तिने पाचूचा जो नेकलेस घातला होता, तो काही वर्षांपुर्वी नीता अंबानींच्या गळ्यात दिसला होता.5 / 6अनंत आणि राधिकाच्या प्री- वेडिंग सोहळ्यादरम्यान इशाने ही सुंदर वेशभुषा करून नीता अंबानी यांचा जडावू नेकलेस घातला होता.6 / 6अनकट डायमंडचा हा लखलखता नेकलेस काही वर्षांपुर्वी नीता अंबानींच्या आणि आता काही दिवसांपुर्वी इशाच्या गळ्यात दिसून आला. आईची दागिन्यांची जाण आणि समज इशाचे साैंदर्य आणखी खुलवून टाकते, हे मात्र खरे...