1 / 7सध्या घरोघरी डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळेच तर चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया असे डासांमुळे होणारे आजारही वाढले आहेत.2 / 7डासांना पळवून लावणारे वेगवेगळे केमिकल्स असणारे मशिन बाजारात मिळतात. पण त्याचा अनेकांना त्रास होतो. श्वास घ्यायला त्रास होतो तर काहींना सर्दी- खोकला होतो. 3 / 7म्हणूनच डासांना पळवून लावण्यासाठी आता हा एक घरगुल उपाय करा. हा उपाय alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.4 / 7हा उपाय करण्यासाठी कडुलिंबाची ८ ते १० वाळलेली पाने घ्या. 5 / 7त्यासोबतच ४ ते ५ तेजपत्ता घ्या.6 / 7कडुलिंबाची पाने आणि तेजपत्ता धूपदानीमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये टाका आणि त्यात थोडा कापूर टाका. 7 / 7यानंतर कापूर पेटवून तिन्ही पदार्थ जाळा आणि त्याचा धूर घरभर पसरवा.. यामुळे डास लगेच पळून जातील.