"तब मुझे याद आयेगा लक्षद्वीप"; मंत्री आठवलेची थेट समुद्र बोटीतून भन्नाट कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:12 AM2024-02-22T10:12:48+5:302024-02-22T10:22:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्रात डुबकी घेतल्यानंतर तेथील निसर्ग सौंदर्याचा अनुभव आणि फोटो सोशल मीडियातून शेअर केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्रात डुबकी घेतल्यानंतर तेथील निसर्ग सौंदर्याचा अनुभव आणि फोटो सोशल मीडियातून शेअर केला होता.

मोदींनी आपल्या ट्विटरवरुन डेस्टीनेशन वेडिंगसाठी भारतातच सुंदर ठिकाणांना भेटी द्याव्यात आणि पर्यटन वाढीस चालना देण्याचंही सूचवलं होतं.

मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारतातील लक्षद्वीप हे निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी अतिशय सुंदर ठिकाण असल्याचं जगभर प्रसिद्धीस आलं. अनेकांनी मालदीवसोबत लक्षद्वीपची तुलना केली

सोशल मीडियात मालदीव आणि लक्षद्वीप वॉर सुरू झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, मालदीव सरकारमधील काहींना मिर्ची लागली होती. मात्र, अखेर मालदीव सरकारने भारताची माफीही मागितली होती.

मोदींच्या दौऱ्यानंतर प्रसिद्धीस आलेल्या लक्षद्वीपाल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही सहकुटुंब भेट दिली. आठवलेंनी येथील निसर्ग सुंदरतेवर कविताही केली. तसेच, फोटोही शेअर केले आहेत.

दुनिया मे मै जहाँ भी जाऊंगा, वहाँ मै समंदर मे देखुंगा शिप, तो मुझे याद आयेगा लक्षद्वीप, अशी भन्नाट कविता रामदास आठवलेंनी लक्षद्वीपमधूनच केली.

लक्षद्वीपमध्ये समुद्रकिनारी रामदास आठवलेंच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केल होते, त्यावेळी ते बोलत होते.

येथील सामाजिक अधिकारीता शिबिरात दिव्यांग जणांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटपही मंत्री आठवले यांच्याहस्ते करण्यात करण्यात आले.

लक्षद्वीप की आज की शाम, करता हूँ मै दिव्यांगजनों के नाम, असे म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर, लक्षद्वीपच्या निसर्ग सौंदर्याचं कौतुकही केलं.

दरम्यान, रामदास आठवलेंसह त्यांची पत्नी आणि मुलानेही लक्षद्वीप समुद्र काठावरुन आणि बोटीवरुन पर्यटनाचा आनंद घेतल्याचं दिसून येत आहे.