म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लॉकडाऊनमध्ये ATM मध्ये जायचे नाहीय? बँकाच घरी आणून देणार कॅश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 18:20 IST
1 / 10कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. यामुळे नागरिकांनी रात्री ८ वाजताच किराना दुकाने, भाजीपाला गाड्यांसमोर गर्दी केली होती. रांगा लागल्याचे चित्र देशभर दिसत होते. 2 / 10अखेर राज्याचे मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवणार असल्याचे आवाहन केले होते. तर काही राज्यांनी घरपोच दूध, अन्नधान्य देण्याची घोषणा केली होती. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील. 3 / 10ATM मध्ये पुरेसे पैसे आहेत. बँकाही सुरु राहणार आहेत. पण घराबाहेर पडल्यास पोलिसांचा मार खावा लागत असल्याने अनेकजण घरातच थांबलेले आहेत. हे चांगलेच आहे. पण एटीएममधून पैसे काढण्यासाठी सूट दिलेली आहे.4 / 10अनेकांच्या बँक खात्यामध्ये पैसे आहेत पण घरात काढून ठेवलेले नाहीत. यामुळे ऐन गरजेच्या वेळेला पैसे लागतीलच. अनेक ठिकाणची किराणामालाची दुकानेही व्यापाऱ्यांनी कोरोनाच्या भीतीने बंद ठेवली आहेत. काही जण दोन, चार तासांसाठीच उघडत आहेत. 5 / 10तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही पैसे घरीही मागवू शकता. कोण देणार? अहो बँकच देणार. ते ही घरात आणून. पहा कसे शक्य आहे ते. 6 / 10लॉकडाऊनच्या दरम्यान बँका आवश्यक सेवा सुरु ठेवणार आहेत. एसबीआय, एचडीएफसी, कोटक महिंद्रा आणि अॅक्सिस बँका त्यांच्या ग्राहकांना कॅश डिलिव्हरी करण्याची सुविधा देतात. 7 / 10देशातील सर्वात मोठी बँक SBI तुमच्या घरी कॅश पोहोचविण्याची सुविधा देते. एवढेच नाही तर एसबीआय तुमच्या घरी येऊन पैसे जमा करण्याचीही सुविधा देते. 8 / 10मेडिकल इमरजन्सीवेळी एसबीआय ग्राहकाला १०० रुपयांचे शुल्क आकारते. या सुविधेचा लाभ उठवून तुम्ही या वेगळ्या सेवेचा लाभ घेऊ शकता. 9 / 10HDFC बँकही तिच्या खातेधारकांना घरी कॅश देण्याची सुविधा देते. यासाठी कॅश लिमिट ५ ते २५००० रुपये एवढे आहे. यासाठी रकमेनुसार १०० ते २०० रुपये आकारले जातात. 10 / 10अॅक्सिस बँक आणि कोटक बँकही घरपोच पैसे देण्याची सुविधा पुरवितात.