रेड टॉप आणि ब्लॅक स्कर्टमध्ये प्राजक्ता माळीने शेअर केले फोटो, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 06:11 PM2021-03-08T18:11:45+5:302021-03-08T18:24:55+5:30

प्राजक्ता माळीचे इंस्टाग्रामवरील स्टायलिश फोटो पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत.

प्राजक्ता माळी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

प्राजक्ता माळीने नुकतेच लाल रंगाचा टॉप आणि ब्लॅक रंगाचा स्कर्ट घातला आहे.

या स्कर्ट टॉपमध्ये प्राजक्ता माळी खूपच स्टनिंग दिसते आहे.

प्राजक्ता माळीचे या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.