...म्हणून नवनीत कौर राणा यांना रडू कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 07:30 PM2019-04-17T19:30:05+5:302019-04-17T19:34:26+5:30

अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीकडून युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार नवनीत कौर राणा निवडणूक लढवत आहेत. काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला

सोमवारी नवनीत कौर अमरावतीच्या लालखडी भागात प्रचार करत होत्या. तेव्हा स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रावसाहेब शेखावत यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत त्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये पठाण चौक इथं हाणामारी झाल्याची घटना घडली. हा प्रकार नवनीत राणा यांच्यासमोर घडल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

गेली अनेक वर्ष नवनीत राणा लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. अशातच जमावाने केलेला विरोध पाहून त्या भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. सध्या त्यांचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतायेत.

मात्र समर्थकांना वाद वाढत गेल्याने ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. अशातच सुरक्षेच्या कारणास्तव नवनीत राणा यांना सुरक्षारक्षकांनी गाडीत बसायची विनंती केली. त्यावेळी गाडीत बसल्यानंतर त्यांना रडू आले.