'स्टुडिओ घिबली' काय आहे? हे नाव कसं सुचलं, कुठून आलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 19:38 IST
1 / 7अनेक जण आपले फोटो धिवली शैलीतल्या अॅनिमेटेड रूपात बदलून ते शेअर करीत आहेत. आपले फोटो घिबली ट्रेंडमध्ये कसे कन्व्हर्ट करायचे हे सांगणारे रील्स, ब्लॉग्ज हेही त्यामुळे ट्रेंडिंग आहेत.2 / 7साहजिकच हे घिबली नक्की काय आहे त्याचा शोधही घेतला जातोय, जपानमधल्या टोकियो या शहरात कागानेई या भागात स्टुडिओ घिबली हा अॅनिमेशन स्टुडिओ आहे. हायाओ मियाझाकी हे या स्टुडिओचे संस्थापक आहेत.3 / 7या स्टुडिओची स्थापना जून १९८५ मध्ये झाली. मियाझाकी आणि स्टुडिओ घिबली ही दोन्ही अॅनिमेशन इंडस्ट्रीतली महत्त्वाची नावे आहेत.4 / 7शॉर्ट फिल्म्स, टीव्ही कमर्शिअल्स आणि टेलिफिल्म्स अशा स्वरूपात स्टुडिओ घिबलीचं काम आहे. त्या कामाला आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत. स्टुडिओ घिबली है नाव मियाझाकी यांनी त्यांच्या विमानप्रेमातून निवडलेलं.5 / 7घिबली हे एका इटालियन विमानाचं टोपण नाव आहे. विमान जसं आकाशात उंच भरारी घेतं तसंच अॅनिमेशनच्या अवकाशात उंच भरारी घेणारी एक नवी लाट म्हणून मियाझाकींनी आपल्या स्टुडिओसाठी घिवली हे नाव निवडलं.6 / 7हातांनी चितारलेली आणि वॉटर कलर, अॅक्रेलिक कलर्सनी रंगविलेली चित्रं ही स्टुडिओ घिबलीची खासियत. आजही स्टुडिओ घिबली आपल्या अॅनिमेशन कलाकृती साकारताना हीच पारंपरिक पद्धत वापरण्याचा प्रयत्न करतात आणि कॉम्प्युटराइज अॅनिमेशन फार क्वचित वापरण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.7 / 7आपले फोटो आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने स्टुडिओ घिबली शैलीत रूपांतरीत करून ते सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे, मात्र हे अनैतिक असल्याची चर्चा मियाझाकी आणि स्टुडिओ घिबलीच्या चाहत्यांमध्ये आहे.