1 / 10अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चीनविरोधात प्रचंड नाराज आहेत. त्यासाठी चीनला घेरण्याची तयारी अमेरिकेने केली आहे. अशातच जी ७ मध्ये भारत, रशिया, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांना सहभागी करण्याची रणनीती आखत आहे.2 / 10जी ७ शिखर संमेलन ट्रम्प यांनी सप्टेंबरपर्यंत पुढे ढकललं आहे. मात्र अमेरिकेच्या या प्रस्तावाशी ब्रिटन सहमत नाही, ब्रिटनला जी ७ ऐवजी जी १० असं स्वरुप हवं. यासाठी अन्य तीन देशांचा समावेश करण्यात अडचण नाही, पण तो रशियाला वेगळं ठेवण्याची मागणी करत आहेत. 3 / 10चीनसोबत अमेरिकेशी संबंध ताणले गेले आहेत. सार्वजनिक व्यासपीठावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा ते बोलून दाखवले आहे. अशावेळी चीनला घेरण्यासाठी अमरिका सर्वात मोठा सहकारी म्हणून भारताकडे पाहत आहे. कारण चीन आणि भारत यांच्या सीमाजवळ आहेत. 4 / 10याच कारणामुळे अमेरिका गेल्या काही वर्षापासून भारतासोबत नातं आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने भारतासोबत स्टेट ऑफ द ऑर्ट हत्यारांचा आणि गुप्तचर माहितीची अदान-प्रदान करणेही वाढवले आहे.5 / 10शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो अशी म्हण आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध याच कारणामुळे चांगले होत आहेत, कारण चीनची आक्रमकता भारतासह अमेरिकेच्याही चिंतेचा विषय आहे. तर ऑस्ट्रेलियालाही चीनने अनेकदा डोळे वटारले आहेत. लडाख सीमेवर भारत-चीन यांच्यातील तणावदेखील अमेरिका भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे.6 / 10ग्रुप ऑफ सेव्हन (जी -७) ही एक आर्थिक संस्था आहे ज्यात जगातील सात प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, जपान, इटली, जर्मनी, फ्रान्स आणि कॅनडा यांचा समावेश आहे. त्याची पहिली परिषद १९७५ मध्ये फ्रान्समध्ये झाली होती. 7 / 10प्रथम त्यात सहा देश होते, ज्यांनी जागतिक आर्थिक संकटाच्या संभाव्य निराकरणासाठी विचारांच्या देवाणघेवाणीवर चर्चा केली. पुढच्या वर्षी कॅनडा यात सामील झाला. प्रत्येक वर्षी एका देशाला अध्यक्षपद दिलं जातं. ऊर्जा, पाणी परिवर्तन, जागतिक सुरक्षा यासारखे अनेक मुद्दे शिखर संमेलनात चर्चेत येतात. 8 / 10दरम्यान, चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रानूसार, अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला आहे. भारताने अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांपासून दूर राहिल्यास चांगले होईल. भारताने अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काहीही पाऊल उचलंल तर कोरोनासारख्या महामारीसोबतच आर्थिक परिणाम देखील खूप खराब होतील असा इशारा दिला आहे.9 / 10काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी काही चीनी नागरिकांवर अमेरिकेत येण्यासाठी निर्बंध घालणार असल्याची घोषणा केली. एवढेच नाही, तर चीनमधून अमेरिकेत होणाऱ्या गुंतवणुकीचे नियमही कठोर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकन काँग्रेसमध्ये चीनविरोधात कठोर पावले उचलण्यासंदर्भात एक विधेयकही सादर करण्यात आले आहे.10 / 10त्यामुळे लडाख सीमेवरून भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या तणावावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली होती. पण दोन्ही देशांनी हे फेटाळून लावत आमच्यात चर्चा सुरु असल्याचं स्पष्ट केले होते.