पिळदार शरीरयष्टी पण तितकाच देखणा चेहर अशा कॉम्बिनेशनमुळे अनेक तरूणी सलमानवर अक्षरश: फिदा आहेत. अनेक तरू तर त्याला आपला आयकॉन मानतात. मैने प्यार किया हम आपके है कौन अशा चित्रपटातून बनलेली चॉकलेट इमेज मोडून काढत सलमानने त्याची एक दबंग इमेज बनवली आहे.शीला की जवानी चिकनी चमेली या आणि अशा अनेक गाण्यांमधून ठुमके लगावत कतरिना कैफने प्रेक्षकांना घायाल केले. तशाच एका पोझमध्ये असलेला तिचा मेणाचा पुतळा रसिकांच्या खूपच पसंतीस उतरला आहे.अप्रतिम नृत्य कौशल्य अतिशय देखणा चेहरा आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे हृतिक रोशनने थोड्याच काळाच चित्रपटसृष्टीत आपलं चांगलचं बस्तान बसवल. तरूणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या या अभिनेत्याचा पुतळाही तितकाच सुंदर बनला आहे.जीवनाचा बिनधास्तपणे आनंद लुटणारी बबली गीत करीना कपूरने जब वी मेट चित्रपटात साकारली. तिचा तो रोल खूप गाजला आणि नावाजलाही गेला. तिचा पुतळा साकारताना या चित्रपटातील एका गाण्यातील लूकच दाखवण्यात आला असून करीनासह सर्वांनाच तो खूप आवडला.आपलं किलींग स्माईल आणि अभिनयाचं खणखणीत नाणं यामुळे बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री ठरलेली ऐश्वर्या राय हिचाही सुंदर पुतळा साकारण्यात आला आहे.बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याच्या व्यक्तीमत्वातली ग्रेस त्याच्या पुतळ्यातही दिसत आहे. आपलेच दुसरे रूप पाहून झालेला आनंद शाहरूखच्या चेह-यावर स्पष्ट दिसत आहे.आपले मनमोहक हास्य दिलखेचक अदा याने रसिकांच्या मनावर वर्षानुवर्ष राज्य करणा-या माधुरी दीक्षितचा मेणाचा पुतळाही तिच्याइतकाच आकर्षक बनला आहे. सर्वांना घायाळ करमारे तिचे हास्य या पुतळ्यातही अगदी बेमालूमपणे उतरले आहे.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे सर्व क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत.... शतक झळकावल्यानंतर आकाशाकडे पाहून प्रथम वडिलांना नंतर दिलखुलास हास्य करत सर्वांना अभिवादन करणा-या सचिनची पोझ तर अतिशय फेमस आहे. त्याचा मेणाचा पुतळा साकारताना तीच पोझ कॉपी करण्याचा मोह सादरकर्त्यांनाही आवरला नाही असंच दिसतयं.चित्रपटासृष्टीतील शहनेशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांचा हा मेणाचा पुतळा. आपले हे हुबेहूब रूप पाहून त्यांच्या चेह-यावरही दिलखुलास हास्य पसरले.एक मुत्सद्दी राजकारणी अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही मेण्याच्या पुतळ्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या मेण्याच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच वानखेडे मैदानात करण्यात आले.