याला म्हणतात ३ इन १; सिक्युरिटी, टॅक्स बेनिफिट, प्रॅाफिट सर्व मिळणार; व्याजातून महिन्याला कमवाल ₹२०,५००
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:55 IST
1 / 8Safe Investment Scheme: जर तुम्ही निवृत्तीनंतर अशी योजना शोधत असाल, जिथे तुमची रक्कम सुरक्षित असेल आणि जास्त परतावा मिळेल, तर पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम तुमच्यासाठी सुपरहिट ठरू शकते. यात तुमची बचत गुंतवून तुम्ही व्याजातून दरमहा २०,५०० रुपयांपर्यंत कमाई करू शकता. 2 / 8यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला तीन फायदे होतील. एक तर तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील, दुसरं म्हणजे तुम्हाला भरपूर व्याज मिळेल आणि तिसरा फायदा म्हणजे तुम्हाला या योजनेत टॅक्स बेनिफिट्सही मिळतील. तर या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.3 / 8पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही डिपॉझिट योजना आहे, ज्यामध्ये ५ वर्षांसाठी ठराविक रक्कम जमा केली जाते. ज्येष्ठ नागरिक या योजनेत जास्तीत जास्त ३०,००,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता, तर किमान गुंतवणुकीची मर्यादा १००० रुपये आहे. सध्या एससीएसएसवर ८.२ टक्के दरानं व्याज मिळत आहे.4 / 8वर सांगितल्या प्रमाणए या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३०,००,००० रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. जर तुम्ही ही रक्कम या योजनेत गुंतवली तर तुम्हाला ५ वर्षात ८.२% दरानं १२,३०,००० रुपयांचं व्याज मिळेल. दर तिमाहीला व्याज म्हणून ६१,५०० रुपयांचे क्रेडिट मिळेल. जर तुम्ही ₹६१,५००० चे तीन भागात विभाजन केलं तर ते ₹२०,५०० होईल. अशा प्रकारे या योजनेतून दरमहा केवळ व्याजाच्या माध्यमातून तुम्ही २०,५०० रुपये कमवू शकता.5 / 8जर तुम्ही या योजनेत ५ वर्षांसाठी १५ लाख रुपये जमा केले तर सध्याच्या ८.२ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला ५ वर्षात फक्त व्याज म्हणून ६,१५,००० रुपये मिळतील. जर तुम्ही तिमाही आधारावर व्याजाचा हिशोब केला तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी ३०,७५० रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही मासिक आधारावर याचा हिशोब केला तर तुम्हाला दरमहा १०,२५० रुपये व्याज म्हणून मिळतील.6 / 8जर एखाद्या वृद्ध व्यक्तीनं या योजनेत गुंतवणूक केली तर त्यालाही इन्कम टॅक्सचा लाभ मिळतो. या योजनेत कलम ८० सी अंतर्गत करसवलतीचा लाभ दिला जातो.7 / 8६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. त्याचबरोबर व्हीआरएस घेणाऱ्या नागरी क्षेत्रातील सरकारी कर्मचारी आणि संरक्षणातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही अटींसह वयोमर्यादेत सवलत दिली जाते. ही योजना पाच वर्षांनंतर मॅच्युअर होते.8 / 8जर तुम्हाला ५ वर्षांनंतरही या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर डिपॉझिट मॅच्युअर झाल्यानंतर तुम्ही खात्याचा कालावधी तीन वर्षांपर्यंत वाढवू शकता. मुदतपूर्तीनंतर १ वर्षाच्या आत ही मुदत वाढवता येते. मुदतपूर्तीच्या तारखेला लागू असलेल्या दरानं विस्तारित खात्यावर व्याज दिलं जातं.