1 / 6Post Office RD: तुम्हीही दर महिन्याला बचत करून गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? आरडीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा निधी तयार होण्यास मदत होते. दर महिन्याला एक रक्कम वाचवून आरडी ची गुंतवणूक केली जाते, ज्यावर निश्चित परतावा मिळतो. 2 / 6पोस्ट ऑफिस रिकरींग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता. पोस्ट ऑफिस आरडीवर वार्षिक ६.७ टक्के व्याज मिळत आहे.3 / 6आरडीमध्ये दरमहा ७,००० रुपये गुंतवून तुम्ही ५ वर्षात एकूण ४,२०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. ५ वर्षानंतर ७९,५६४ रुपये आणि मॅच्युरिटीवर ४,९९,५६४ रुपये मिळतील.4 / 6तुम्ही महिन्याला ५,००० रुपयांच्या आरडीमध्ये वर्षभरात ६०,००० रुपये आणि पाच वर्षांत एकूण ३,००,००० रुपये गुंतवता. ५ वर्षांनंतर ६.७ टक्के दरानं ५६,८३० रुपये व्याज मिळणार आहे. मॅच्युरिटीवर तुम्हाला ३,५६,८३० रुपये मिळतील.5 / 6जर तुम्ही दरमहिन्याला आरडीमध्ये ३,००० रुपये गुंतवले तर तुम्ही वर्षभरात ३६,००० रुपये गुंतवता. ५ वर्षात तुमची एकूण गुंतवणूक १,८०,००० रुपये असेल. पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, नवीन व्याजदरानुसार तुम्हाला ३४,०९७ रुपये व्याज म्हणून मिळतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,१४,०९७ रुपये मिळतील.6 / 6आरडीवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जातो. आरडीवर मिळणाऱ्या व्याजदरावर १० टक्के टीडीएस लागू होतो. आरडीवरील एक महिन्याचं व्याज १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर टीडीएस कापला जाईल. केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय दर तीन महिन्यांनी अल्पबचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजाचा आढावा घेते.