1 / 12पेटीएमने मर्चंट लेंडिंग बिझनेसवर आपली पकड मजबूत करण्यासाठी मार्च, 2021पर्यंत सूक्ष्म लघु तसेच मध्यम स्वरुपांच्या उद्योगांना (MSMEs) 1,000 कोटी रुपयांचे कर्ज देण्याची योजना तयार केली आहे. 2 / 12Paytm अशा उद्योजकांना कर्ज देईल, ज्यांना रेग्युलर बँकांकडून रोजगार सुरू करण्यासाठी लोन मिळत नाही. 3 / 12आर्थिक वर्ष 2019-20मध्ये Paytmने MSMEsला कर्जाच्या स्वरूपात 550 कोटी रुपये दिले होते. मात्र कंपनीने यावेळी ही रक्कम वाढवून 1,000 कोटी परुपये केली आहे.4 / 12Paytm बरोबरच गूगल पे (Google pay) आणि फोन पे (PhonePE)नेही व्यापारी कर्ज देण्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. 5 / 12गूगल पे आणि फोन पे अनेक लायसंसी बँका आणि NBFCsच्या सोबतीने छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देत आहेत. 6 / 12Paytmने गुगल पे आणि फोन पे यांना काउंटर करण्यासाठी MSMEsसाठी कर्ज देण्याच्या रकमेत वाढ केली आहे.7 / 12Paytm Lendingचे सीईओ भावेश गुप्ता म्हणाले, कंपनी कुठल्याही स्वरुपाच्या गॅरंटी शिवाय कुटलीही गोष्ट तारण न ठेवता, छोट्या व्यापाऱ्यांना आणि MSMEsना अत्यंत कमी व्याजदरात 5 लाख रुपयांपर्यंत इंस्टंट लोन (collateral-free instant loans) देईल. 8 / 12गुप्ता म्हणाले, कंपनी आपल्या मर्चंट लेंडिग प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना पेटीएम बिझनेस अॅपवर collateral-free instant loans अत्यंत सहजपणे उपलब्ध करून देईल.9 / 12कर्ज घेण्यासाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही, हे Paytm Business appचे अल्गोरिदम निश्चित करेल. 10 / 12व्यापाऱ्याकडून पेटीएमवर करण्यात येणाऱ्या दैनंदिन सेटलमेंटच्या आधारे, Paytm Business appचे अल्गोरिदम, कर्ज घेणारी व्यक्ती त्या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहे की नाही, यासंदर्भात निर्णय घेते.11 / 12आर्थिक वर्ष 2019-20मध्ये Paytmने 1 लाखहून अधिक छोट्या व्यापाऱ्यांना आणि MSMEsना 550 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. 12 / 12Paytm Lending सीईओ भावेश गुप्ता यांनी सांगितले, कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करण्यापासून ते लोन देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. तसेच यासाठी कुठल्याही स्वरुपाच्या अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही.