1 / 12केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विविध क्षेत्रांसाठी आणि विविध वर्गांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यात काही योजना अशाही आहेत, ज्याचा लाभ अगदी कमी पैशांत घेऊन भविष्य सुरक्षित केले जाऊ शकते. विशेष म्हणजे, या योजनांत 400 रुपयांपेक्षाही कमी गुंवणूक केली जाऊ शकते.2 / 12केंद्र सरकारने मे 2015 मध्ये पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना सुरू केली. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना हा सरकारचा टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. टर्म प्लॅनचा अर्थ पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच विमा कंपनी विम्याची रक्कम देते. मात्र, संबंधित पॉलिसीधारक विमा योजनेचा काळ पूर्ण होईपर्यंत जिवंत असेल, तर त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही.3 / 12जीवन ज्योती विमा पॉलिसीसाठी मॅच्यूरिटी वय 55 वर्षांचे आहे. हा प्लॅन दरवर्षी रिन्यू करावा लागतो. यात अश्योर्ड अमाउंट म्हणजेच विम्याची रक्कम 2,00,000 रुपये एवढी आहे.4 / 12पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठीचे वार्षिक प्रिमियम 330 रुपये एवढे आहे. या योजनेचा लाभ 18 -50 वर्षांतील कुण्याही भारतीय नागरिकाला घेता येऊ शकतो.5 / 12पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी वर्षाला केवळ 12 रुपयेच लागतात. ज्यांचे वय 18 ते 70 वर्षांच्या आत आहे. केवळ त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. 6 / 12हा विमा घेणाऱ्या व्यक्तीचा अॅक्सिडेंटल मृत्यू अथवा तो अपंग झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मिळतात.7 / 12या दोन्ही विमा पॉलीसीजसंदर्भात आपल्याला https://jansuraksha.gov.in/ वेबसाईटवर अधिक माहिती मिळू शकते. या शिवाय आपल्याला टोल फ्री क्र. - 1800-180-1111 / 1800-110-001 वरही सविस्तर माहिती मुळू शकते.8 / 12सुरक्षित भविष्यासाठी मोदी सरकारने आणखी एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे. अटल पेन्शन योजना (APY). मोदी सरकारची ही योजना सर्वाधिक चर्चेत आहे. 9 / 12अटल पेन्शन योजनेत आपण आतापासूनच मोजकी गुंतवणूक करून वृद्धापकाळासाठी एका ठरावीक पेन्शनची व्यवस्था करू शकतात. 10 / 12या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. या वयात आपण 42 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.11 / 12या योजनेच्या फायद्याचा विचार केल्यास, आपले वय 60 वर्ष झाल्यानंतर आपल्याला मृत्यूपर्यंत एक ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरुपात मिळत जाईल.12 / 12विशेष म्हणजे, आपल्या मृत्यू पश्चात आपल्या सहकाऱ्यालाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.