शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकदा पैसे गुंतवा, आयुष्यभरासाठी ₹१,४२,५०० चं पेन्शन पक्कं; LIC ची ही स्कीम बहुतेकांना माहितच नाही

By जयदीप दाभोळकर | Updated: June 2, 2025 09:03 IST

1 / 8
LIC Pension Plan: एलआयसी देशातील सर्व नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध योजना चालवते. यापैकीच एक योजना म्हणजे एलआयसीची न्यू जीवन शांती योजना. एलआयसीची नवीन जीवन शांती योजना ही नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, इंडिव्हिज्युअल, सिंगल प्रीमियम, डिफर्ड अॅन्युइटी प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही लाइफटाइम पेन्शनची व्यवस्था करू शकता. पेन्शनसाठी तुम्हाला वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक असा पर्याय मिळतो. यामध्ये सिंगल आणि जॉइंट असे दोन प्रकारचे प्लॅन दिले जातात.
2 / 8
नवीन जीवन शांती योजनेत दोन गुंतवणूक पर्याय दिले आहेत, पहिला सिंगल लाईफ आणि दुसरा जॉईंट लाईफ. जर तुम्ही डेफर्ड अॅन्युइटी फॉर सिंगल लाइफ प्‍लॅनमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला डिफर्ड कालावधी पूर्ण झाल्यानंतर पेन्शन म्हणून एक निश्चित रक्कम मिळते आणि तुमच्या मृत्यूनंतर गुंतवलेले पैसे तुमच्या नॉमिनी व्यक्तीला परत केले जातात.
3 / 8
'डिफर्ड अॅन्युइटी फॉर जॉइंट लाईफ प्लॅन' मध्ये गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला डिफर्ड कालावधी पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळू लागते आणि मृत्यूनंतर, ज्या व्यक्तीचे नाव जॉइंट केले आहे त्याला आयुष्यभर पेन्शन मिळते. दोघांच्याही मृत्यूनंतरच गुंतवलेली रक्कम नॉमिनी असेल्या व्यक्तीला परत केली जाते.
4 / 8
या योजनेत किमान १.५ लाख रुपये गुंतवणे आवश्यक आहे. तर मॅक्सिमम परचेज प्राईजची मर्यादा नाही. १.५ लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला वार्षिक १२ हजार रुपये आणि मासिक १००० रुपये पेन्शन मिळते. ३० ते ७९ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकते.
5 / 8
ही पॉलिसी खरेदी करताना, लक्षात ठेवा की डिफरमेंट कालावधी (गुंतवणूक आणि पेन्शन सुरू होण्यामधील कालावधी) जितका जास्त असेल किंवा वय जितकं जास्त असेल तितकं तुम्हाला चांगलं पेन्शन मिळेल. किमान डिफरमेंट कालावधी १ वर्ष आहे आणि कमाल डिफरमेंट कालावधी १२ वर्षे आहे.
6 / 8
जर तुम्ही ४५ वर्षांच्या वयात नवीन जीवन शांती योजनेची सिंगल लाईफसाठी डिफर्ड अॅन्युइटी १० लाख रुपयांना खरेदी केली आणि १२ वर्षांचा डिफर्ममेंट कालावधी ठेवला तर १२ वर्षांनंतर तुम्हाला वार्षिक १,४२,५०० रुपये मिळण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही सहामाही पेन्शन पर्याय निवडला तर तुम्हाला दर सहा महिन्यांनी ६९,८२५ रुपये, तिमाही पेन्शन पर्याय निवडला तर ३४,५५६ रुपये आणि मासिक पेन्शन पर्याय निवडला तर दरमहा ११,४०० रुपये मिळतील.
7 / 8
जर तुम्ही ४५ व्या वर्षी १२ वर्षांच्या डिफर्मंट कालावधीसह १० लाख रुपयांना डिफर्ड अॅन्युइटी फॉर जॉइंट लाइफ प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला वार्षिक १,३३,४०० रुपये, सहा महिन्यांनंतर ६५,३६६ रुपये, तीन महिन्यांनंतर ३२,३५० रुपये आणि मासिक १०,६७२ रुपये पेन्शन म्हणून मिळतील.
8 / 8
या पॉलिसीमध्ये तुम्हाला कर्ज घेण्याची सुविधा देखील दिली जाते, तर डेथ बेनिफिट् देखील पॉलिसीमध्ये समाविष्ट आहेत. जर तुम्हाला पॉलिसी खरेदी केल्यानंतर आवडली नाही, तर तुम्ही ती कधीही सरेंडर करू शकता.
टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनLIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूक