1 / 6Post Office Investment Tips: गुंतवणूक करताना प्रत्येकजण जास्तीत जास्त नफा कमावण्याचा विचार करतो. अशा काही योजना आहेत जिथे तुम्ही तुमच्या पत्नीच्या मदतीनं तुम्ही जेवढा नफा कमावू शकता तेवढा तुम्ही एकट्यानं कमावू शकत नाही. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम हीदेखील अशीच एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळू शकतं. पण जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत मिळून यात गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्त नफा कमावण्याची संधी मिळते, तसंच तुमची गुंतवलेली रक्कमही सुरक्षित राहते. या योजनेच्या माध्यमातून पती-पत्नी वर्षाला १,११,००० रुपयांपर्यंत कमाई करू शकतात. कसं ते समजून घेऊ.2 / 6POMIS ही अशी डिपॉझिट स्कीम आहे, ज्यामध्ये दरमहा व्याज मिळतं. या योजनेत सिंगल आणि जॉइंट अशी दोन्ही खाती उघडण्याची सुविधा आहे. एकाच खात्यात ठेवीची मर्यादा कमी असते, तर संयुक्त खात्यात ती जास्त असते. जमा रकमेवर व्याज मिळतं आणि जमा केलेली रक्कम ५ वर्षांनंतर परत केली जाते. अशावेळी तुमची डिपॉझिटही खूप सुरक्षित असते. जर पती-पत्नीनं या योजनेत एकत्र गुंतवणूक केली तर ते संयुक्त खात्यात अधिक गुंतवणूक करू शकतात आणि त्या रकमेवर अधिक कमाई करू शकतात.3 / 6सध्या पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीमवर ७.४ टक्के दरानं व्याज मिळत आहे. जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत १५ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला ७.४ टक्के व्याजानं दरमहा ९,२५० रुपये उत्पन्न मिळेल. ९,२५० x १२ = १,११,००० रुपये. अशा प्रकारे तुम्ही दरवर्षी १,११,००० रुपये कमवू शकता आणि ५ वर्षात घरी बसून ५,५५,००० रुपये कमवू शकता.4 / 6जर तुम्ही सिंगल खातं उघडलं तर तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करू शकता. यामध्ये तुम्हाला दरमहा ५,५५० रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्ही एका वर्षात ६६,६०० रुपये व्याज म्हणून घेऊ शकता. ६६,६००x ५ = ३,३३,००० रुपये, अशा प्रकारे एका खात्यातून ५ वर्षांत व्याजाच्या माध्यमातून एकूण ३,३३,००० रुपये मिळू शकतात.5 / 6खात्यात ठेवलेल्या ठेवींवर मिळणारं व्याज दरमहा पोस्ट ऑफिस बचत खात्यात भरलं जातं. दरम्यान, अनामत रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे. ५ वर्षांनंतर तुम्ही तुमची जमा केलेली रक्कम काढू शकता. जर तुम्हाला या योजनेचा आणखी फायदा घ्यायचा असेल तर मॅच्युरिटीनंतर तुम्ही नवीन खातं उघडू शकता.6 / 6पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये देशातील कोणताही नागरिक खातं उघडू शकतो. मुलांच्या नावानेही खातं उघडू शकता. मुलांचं वय १० वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या नावानं खातं उघडू शकतात. मूल १० वर्षांचं झाल्यावर त्याला खातं चालवण्याचा अधिकार स्वत: मिळू शकतो. एमआयएस खात्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड देणं बंधनकारक आहे.