1 / 6रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेकडून (Railways) वेळोवेळी अनेक विशेष सुविधा आणल्या जातात. यामधील एक म्हणजे तुम्ही अनोळखी ठिकाणी एकटे प्रवास करत असाल तर रेल्वेकडून देण्यात येणारी सुविधा तुमच्यासाठी खास आहे.2 / 6अनेक वेळा असे घडते की, प्रवासी ट्रेनमध्ये झोपतात आणि ज्या स्टेशनला उतरायचे असते, त्याच्यापुढे ते निघून जातात किंवा कोणतं स्टेशन आलं, हे न समजल्यामुळे पुढील स्टेशनपर्यंत पोहोचतात. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो.3 / 6आता यापुढे अशा प्रवाशांना याची चिंता करावी लागणार नाही. रेल्वेने एक विशेष सुविधा सुरू केली आहे, ज्याअंतर्गत तुम्हाला उतरायच्या म्हणजेच निश्चित केलेल्या स्टेशनच्या आधी अलर्ट मिळेल.4 / 6दरम्यान, डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्मची सुविधा रेल्वेकडून उपलब्ध असेल, याअंतर्गत तुम्ही ज्या स्टेशनला उतरणार आहात, त्या स्टेशनच्या आधी अलार्म मिळेल. तुम्हाला त्या स्टेशनच्या 20 मिनिटे आधी अलार्म मिळेल.5 / 6या सुविधेबद्दल तुम्ही ग्राहक सेवा नंबर 139 वर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकतात. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. 139 नंबरवर कॉल केल्यानंतर, तुम्हाला पहिल्यांदा भाषा निवडावी लागेल. यानंतर डेस्टिनेशन अलर्टसाठी आधी 7 आणि नंतर 2 नंबर प्रेस करावे लागतील.6 / 6यानंतर प्रवाशांना त्यांचा पीएनआर नंबर विचारला जाईल. जेव्हा तुमचा पीएनआर नंबर व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर तुमचा अलर्ट फीड केला जाईल. याशिवाय तुम्हाला फोनवर मेसेजद्वारे कन्फर्मेशनही मिळेल. या मेसेजसाठी तुम्हाला 3 रुपये चार्ज द्यावा लागेल.