काम मिळवण्यासाठी 'या' सुपरस्टार्सनी झिजवले दिग्दर्शकांच्या घराचे उंबरठे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 03:20 PM2021-11-25T15:20:00+5:302021-11-25T15:20:00+5:30

Bollywood actors: कामासाठी अक्षयकुमारपासून ते सारा अली खानपर्यंत अनेक कलाकारांनी दिग्दर्शक, निर्मात्यांचे उंबरठे झिजवले आहेत. त्यामुळे कामासाठी वणवण फिरणारे कलाकार कोणते ते पाहुयात.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याची मुख्य भूमिका असलेला 'जर्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिने अलिकडेच एका मुलाखतीत त्याच्या करिअरविषयी खुलासा केला. 'कबीर सिंह'च्या यशानंतरही मला दारोदार कामासाठी भीक मागावी लागली असं शाहिद म्हणाला. त्यामुळेच कामासाठी दिग्दर्शक, निर्मात्यांचे उंबरठे झिजवणारे कलाकार कोणते ते पाहुयात.

नीना गुप्ता - बिंधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या नीना गुप्ता यांनाही कलाविश्वात अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. मुंबई सोडून त्या पतीसोबत दिल्लीत स्थायिक झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या कामाच्या ऑफर्स कमी झाल्या होत्या. एक वेळ अशी आली होती. की त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत कामाची गरज असल्याचं म्हटलं होतं.

विनीत कुमार सिंह - मुक्काबाज या चित्रपटामुळे चर्चेत आलेला विनीत कुमार याने चित्रपटात काम मिळावं यासाठी अनुराग कश्यपला विनंती केली होती.

कार्तिक आर्यन - गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यन सातत्याने चर्चेत येत आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या कलाकारालाही एकेकाळी चित्रपटांसाठी अनेक दिग्दर्शक,निर्मात्यांना मिन्नतवाऱ्या कराव्या लागल्या होत्या. कार्तिक आर्यनने त्याच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून फराह खानकडे चित्रपटात काम देण्याविषयी सांगितलं होतं.

सारा अली खान- रोहित शेट्टीने त्याच्या सिंबा चित्रपटाची घोषणा केल्यानंतर या चित्रपटात काम मिळावं यासाठी सारा अली खानने रोहितला फोन केला होता. या चित्रपटात काम करायची संधी मिळावी यासाठी विनंती करत होती. विशेष म्हणजे तिने रोहितला अनेक मेसेज करुन त्रास दिला होता.

अनिल कपूर - बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर हे नाव जरी आज कलाविश्वात अग्रस्थानी असलं तरीदेखील एकेकाळी त्याने यश राज यांच्याकडे कामाची मागणी केली होती.

अक्षय कुमार - पॅडमॅनमध्ये काम मिळावं यासाठी अक्षयने ट्विंकल खन्नाला अनेक मिन्नतवाऱ्या केल्या होत्या असं सांगण्यात येतं.

Read in English