बॉलिवूडमधील काही अभिनेते-अभिनेत्रींना आहेत या घाणेरड्या सवयी, वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:14 PM2021-07-27T16:14:42+5:302021-07-27T16:18:55+5:30

बाॅलिवूडमधील असे काही अभिनेते – अभिनेत्री आहेत की ज्यांना काही वाईट सवयी देखील आहेत. त्यांच्या या सवयी ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

राणी मुखर्जीः बाॅलिवूड आणि व्यसन हे एक अजब समीकरण आपल्याला पाहायला मिळते. याच बाबतीत राणी मुखर्जीची वाईट सवय म्हणजे ती सिगारेट ओढते.

प्रीती झिंटा : बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाला साफसफाई आणि स्वछतेची अति सवय आहे. ती हॉटेलच्या खोलीत पोहोचते तेव्हा सर्वात अगोदर ती बाथरूमची स्वच्छता पाहते. जरी स्वच्छता करण्याची सवय चांगली असली तरी ही अति सवय जेव्हा शिगेला पोहोचते तेव्हा ती इतरांसाठी समस्या निर्माण करू शकते.

सुष्मिता सेन : सुष्मिता सेनची आवड ऐकाल तर तुम्ही हैराण व्हाल. सुष्मिताला चक्क घरामध्ये साप पाळण्याची आवड आहे. तसेच एखाद्या खुल्या छतावर एखाद्या टबमध्ये आंघोळ करण्याची देखील आवड आहे.

विद्या बालन : विद्या बालनची एक सवय ऐकल्यावर तुम्हाला थोडे विचित्र वाटेल. झोपताना सर्वजण सुटेबल नाईट सूट घालून झोपतात. पण विद्या बालन मात्र नाईट सुट ऐवजी साडीवरच झोपणे पसंत करते.

जाॅन अब्राहम :- बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहमला स्वतःचे पाय हलविण्याची भारी विचित्र सवय आहे. ही सर्वसाधारण सवय असली तरी काही वेळेस ती समोरच्यासाठी इरिटेटिंग ठरू शकते. ज्यामुळे जाॅनला बऱ्याचदा ऐकावे लागते.

करीना कपूर :- करीना कपूरची वाईट सवय म्हणजे ती सतत हाताच्या बोटाची नखे चावत असते.

सलमान खान : सलमान खानला सुद्धा एक सवय आहे. खरेतर आपण याला त्याची आवड म्हणू शकतो. सलमानकडे साबनांचा खूप मोठा असा संग्रह आहे. सलमानकडे हाताने बनवलेले डिजाइनर आणि हर्बल असे सर्व प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. सलमानला अशाप्रकारे साबणी जमवण्याची आवड आहे.

सनी लियोनी :- सनी लियोनीलादेखील एक विचित्र सवय आहे. सनीला चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आपल्या पायांची काळजी घ्यायला खूपच आवडते. ती प्रत्येक वेळी आपले पाय स्वच्छ करत असते. तिला आपल्या पायांंवरती खूपच प्रेम आहे. जिस्म २ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिच्या सवयीला पाहून लोक हैराण झाले होते. ती प्रत्येक पंधरा मिनिटाच्या नॅपमध्ये आपले पाय स्वच्छ करत होती.