Mallika Sherawat Birthday : कुटुंबीयांचा विरोध, अभिनयासाठी सोडलं घर, तो निर्णय घेतला आणि बदललं मल्लिका शेरावतचं नशीब...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 11:11 AM2021-10-24T11:11:33+5:302021-10-24T11:15:39+5:30

Mallika Sherawat Birthday: मल्लिका शेरावत हिने ख्वाहिश आणि मर्डरसारख्या चित्रपटामध्ये बोल्ड आणि बिनधास्त सिन देऊन एकेकाळी बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली होती.

आपल्या हॉट अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी बॉलिवूडमधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री मल्लिका शेरावत हिचा आज वाढदिवस. मल्लिका शेरावत हिचा जन्म हरियाणामध्ये २४ ऑक्टोबर १९७६ रोजी झाला होता. जाट कुटुंबात जन्मलेल्या मल्लिका शेरावतचं खरं नाव रीमा लांबा आहे. रीमाच्या चित्रपटात काम करण्याला कुटुंबीयांचा विरोध होता. तिचे वडील तिला सरकारी अधिकारी बनवू इच्छित होते. पण रीमाला चित्रपटांचं आकर्षण होतं. त्यामुळे तिने अभिनयासाठी घर सोडलं.

रीमा लांबा जेव्हा मुंबईत पोहोचली तेव्हा काम मिळवण्यासाठी तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. रीमा जेव्हा शोबिझचा भाग बनली तेव्हा तिने आपले नाव बदलून मल्लिका शेरावत ठेवले. आपल्या आईचे आडनाव आपण घेतल्याचे तिने एका मुलाखतील सांगितले.

मल्लिका शेरावत हिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. टीव्ही जाहिरातींमध्ये तिने अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसारख्या मोठ्या स्टार्सबरोबर काम केले होते.

फिल्मी जगतात पदार्पण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मल्लिकाने २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या जीना सिर्फ मेरे लिए चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. मात्र २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ख्वाहिश चित्रपटातील किसिंग सीनमुळे मल्लिका शेरावतच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

मल्लिका शेरावतने तिचा पुढचा चित्रपट असलेल्या मर्डरमध्ये बोल्डनेसची सर्व सीमा ओलांडली. तिने या चित्रपटात एवढे बोल्ड सीन दिले कि तिच्या नावाचा डंका वाजू लागला. अनुराग बासूच्या या चित्रपटानंतर मल्लिकाची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ लागली होती.

मल्लिका शेरावतला याचा फायदा झाला. तिला हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळाले. जॅकी चेनसोबत तिने मिथ चित्रपटात काम केल्यावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तसेच तिला प्रसिद्धीही मिळाली.

मल्लिकाने त्यानंतर हिस्स, डबल धमाल, डर्टी पॉलिटिक्स, बचके रहना रे बाबा, किस किस की किस्मत, प्यार के साईड इफेक्ट अशा चित्रपटांमध्ये काम केले.

मल्लिका शेरावतच्या फिल्ली कारकिर्दीएवढीच तिची पर्सनल लाईफ, विवाह, एका मुलाची आई असणे याचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मल्लिकाने माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिला किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला याची माहिती तिने दिली.

मल्लिका शेरावतने वेब सिरीजमध्येही काम केले आहे. आजही मल्लिका शेरावतच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेसचीच अधिक चर्चा होते.

Read in English