‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित इतक्या कोटींची मालकीण, जाणून संपत्ती आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 04:39 PM2021-12-01T16:39:58+5:302021-12-01T16:50:04+5:30

‘धकधक गर्ल’ म्हणा किंवा नुसत्या स्मितहास्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी सौंदर्यवती म्हणा. कितीही विशेषणं वापरली तरही अनेकांच्याच डोळ्यांसमोर निर्विवादपणे एकच चेहरा उभा राहतो तो म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेचा.

सोशल मीडियावरही माधुरीची फॅन फॉलोइंग प्रचंड मोठी आहे.फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते.

आज माधुरी दीक्षित आलिशान आयुष्य जीवन जगते आणि यामागे तिची मेहनत स्पष्टपणे दिसून येते.

माधुरी दीक्षितची कमाई चांगली आहे. ती चित्रपट, ब्रँड प्रमोशन, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर कमाई करते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका महिन्यात 1 कोटींहून अधिक कमावते, तर ती एका वर्षात सुमारे 12 कोटी रुपये कमावते.

माधुरी दीक्षितच्या घराबद्दल बोलायचे झाले तर, ती पती श्रीराम माधव नेने, मुले अरिन आणि रेयान यांच्यासोबत मुंबईतील पलटियाल येथील तिच्या आलिशान बंगल्यात राहते. या बंगल्यात सर्व सुखसोयी आहेत.

इतर सेलिब्रिटींप्रमाणेच माधुरी दीक्षितलाही लक्झरी आणि महागड्या कारची आवड आहे.

तिच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे रोल्स रॉयस, ऑडी, स्कोडा रॅपिड आणि इनोव्हा क्रिस्टासारख्या अनेक कार आहेत.

माधुरी दीक्षित ही करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरीकडे 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

2021 मध्ये त्यांची एकूण संपत्ती $ 34 दशलक्ष असल्याचे सांगितले जाते.

Read in English