'हे' हिंदी कलाकार अस्खलितपणे बोलतात मराठी, आजही जपला आहे त्यांनी मराठीचा गोडवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:37 PM2020-02-25T12:37:38+5:302020-02-25T15:27:09+5:30

आमिर खानने मध्यंतरी मराठीसाठी खास ट्युशन सुरु केली होती. तो काही कार्यक्रमांमध्ये मराठीत बोलला होता. 'चला हवा येऊ द्या' या शोमध्येही त्याने मराठीतून संवाद साधला होता.

अभिनेता संजय दत्तनेही काहीवेळा पत्रकारांशी मराठीत संवाद साधला आहे. त्यालाही मराठी भाषा आवडते

अभिनेत्री राणी मुखर्जीने 'अय्या' या सिनेमात एका मराठी मुलीची भूमिका साकारली होती.

अभिनेता सुनील शेट्टी देखील काही कार्यक्रमांमध्ये मराठीत बोलला होता. त्यालाही मराठी भाषा आवडते

अभिनेता जॉन अब्राहमही मराठीतून संवाद साधतो. त्यालाही मराठीत बोलायला आवडतं. 'सविता दामोदर परांजपे' या मराठी सिनेमाची निर्मितीही त्याने केली आहे

ऐश्वर्या रायला मराठी भाषा आवडते. मराठी ही एक गोड भाषा आहे असं ऐश्वर्या रायने एका मुलाखतीत म्हटलं होतं तसंच तिने काही मुलाखतींमध्ये थोडं फार मराठी बोलण्याचाही प्रयत्न केला होता.

बॉलिवूडचा लाडका जग्गूदादा अर्थात जॅकी श्रॉफलाही चांगलं मराठी बोलता येतं. भिडु हा त्याचा लाडका शब्द आहे.

अभिनेता विकी कौशलही एका कार्यक्रमात मराठी बोलला होता.

विद्या बालन ही अभिनेत्री मुंबईतच लहानाची मोठी झाली आहे. तिलाही मराठी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येते

अक्षय कुमाने देखील अनेकदा मुलाखती मध्ये मराठीत संवाद साधला आहे व तो मराठी चांगलं बोलतो.

तान्हाजी सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी अजय देवगणही मराठीत बोलला होता. तसेच सिंघममध्येही त्याने काही संवाद मराठीत साधले आहेत. तसंच अजय देवगणला चांगलं मराठी बोलता येतं

अभिनेता अर्जुन कपूरलाही मराठी येतं. 'पानिपत' सिनेमात त्याने सदाशिवराव भाऊची भूमिका साकारली. यासाठीही त्याने मराठी बोलण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं

विरार का छोकरा अशी ओळख असलेला गोविंदा हा देखील मस्त मराठी बोलतो.

अभिनेता रणवीर सिंगनेही 'बाजीराव मस्तानी' या सिनेमामध्ये मराठी भाषेचे धडे गिरवले. रणवीरलाही मराठी आवडतं

अभिनेत्री काजोल मराठीच आहे. तिला चांगलं मराठी बोलता येतं तिनेही खुप वेळा पत्रकार परिषदमध्ये मराठीतून संवाद साधला आहे