शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

येलदरी दाखल झाले साडेपाच दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST

यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येलदरी प्रकल्पामध्ये ६० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पाण्याने भरेल, अशी अपेक्षा निर्माण ...

यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येलदरी प्रकल्पामध्ये ६० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पाण्याने भरेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. जून आणि जुलै असे दोन महिने प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. सद्यस्थितीला या प्रकल्पामध्ये ७५.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मागील २२ दिवसांपासून पावसाने ताण दिल्यामुळे प्रकल्पात नवीन पाणीसाठा दाखल झाला नव्हता. मात्र दोन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत आहे. मागील २५ तासांमध्ये या प्रकल्पात ५.७८ दलघमी पाण्याची आवक झाली असून प्रकल्पाच्या जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ही ७५.३४ टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा प्रकल्प शंभर टक्के भरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ग्रामस्थांना दिलासा सतर्कतेचा इशारा

या प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या सिद्धेश्वर प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या प्रकल्पात सध्या ४१३ मीटर पाणी पातळी निर्माण झाली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ०.३७ मीटर पाणीपातळी शिल्लक आहे. दरम्यान हवामान खात्याने आणखी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात केव्हाही वाढ होऊन प्रकल्पातून पाणी सोडले जाऊ शकते. तेव्हा नदीपात्र शेजारील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असा इशारा हट्टा पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.