तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ८ फेब्रुवारी रोजी सोळा ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली. यात कोद्री ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सरपंच पदासाठी माणिक भगवान दराडे व महानंदा नागनाथ लटपटे यांच्यात आणि उपसरपंच पदासाठी राणी अर्जुन नानवटे व गोदावरी पांडुरंग लटपटे यांच्यात झालेल्या लढतीत ४ विरुद्ध ७ मते घेऊन सरपंचपदी महानंदा नागनाथ लटपटे या व उपसरपंचपदी गोदावरी पांडुरंग लटपटे या निवडून आल्या. मुळी ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी हातवर करून झालेल्या निवडणूक प्रक्रियेत ९ पैकी ६ मते घेऊन सरपंचपदी सत्यभामा श्रीहरी भोसले या तर उपसरपंचपदी खोबराजी गणपती भुमरे हे निवडून आले. डोंगरपिंपळा सरपंचपदी सत्यभामा ज्ञानोबा तिडके यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदासाठी हातवर करून झालेल्या निवडणुकीत मोहिनी माणिक कतारे यांनी पाच मते घेतल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. पोखर्णी वाळके ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुनिता दत्तात्रय वाळके यांची तर उपसरपंचपदी पारबतबाई बालासाहेब परकड, आनंदवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रतन तुकाराम चाटे, उपसरपंचपदी बालाजी व्यंकटी दहिफळे, टोकवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी छबुबाई नागोराव नागरगोजे यांची तर उपसरपंचपदी लताबाई मुंजाजी तांदळे, बनपिंपळा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संगीता इंद्रजित कोरके यांची तर उपसरपंचपदी पांडुरंग उत्तम मुलगीर,शेंडगा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुमन तुकाराम तिडके यांची तर उपसरपंचपदी दत्तात्रय केशव बिडगर, सांगळेवाडी ग्राम पंचायतच्या सरपंचपदी मंगल निवृत्ती भेंडेकर यांची तर उपसरपंचपदी अनिता गणेश सांगळे, वागदरा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी धोंडाबाई विठ्ठल भंडगे यांची व उपसरपंचपदी गोविंद दत्तराव सानप, डोंगरगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नंदाबाई दत्ता गाढे यांची तर उपसरपंच पदी माधव लिंबाजी सोडगीर, चिंचटाकळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माधुरी अनिल मोरे यांची तर उपसरपंचपदी सिताबाई पोमा चव्हाण , खळी ग्रामपंचायत सरपंच पदी शिवाजी बापुराव पवार व उपसरपंचपदी जयश्री चांगदेव सोन्नर, मरगळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मारोती गंगाधर मुंढे यांची व उपसरपंचपदी सारिका अनंत उपाडे, बोर्डा ग्रामपंचायत सरपंचपदी संभाजी विनायक मुंढे, उपसरपंचपदी शोभा संतोष चव्हाण यांची तर भेंडेवाडी ग्राम पंचायतच्या सरपंचपदी भारत मारोती भेंडेकर तर उपसरपंचपदी व्यंकट निवृत्ती भेंडेकर यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली. १६ ग्रामपंचायती पैकी १२ ग्राम पंचायतीचे सरपंचपद महिलांनी मिळविल्याने तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलाराज आल्याचे पहावयास मिळत आहे.
१२ ग्रामपंचायतीत महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST