स्थानिक गुन्हा शाखेचे सय्यद मोबीन सय्यद रहीम यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पथक मंगळवारी पेडगाव परिसरात गस्तीवर असताना पाथरी रस्त्यावरील दंत महाविद्यालयाच्या परिसरात दोन व्यक्ती अनधिकृतपणे दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्या अधारे पथकाने दुचाकींच्या तपासणीस प्रारंभ केला. दुपारी ३.३० च्या सुमारास दोन व्यक्ती या रस्त्याने येत असल्याचे दिसून आले. दुचाकी थांबवून पथकाने चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे ओंकार शिंदे, धीरज वावळ असे सांगितले. यावेळी त्यांच्याकडील थैलीची तपासणी केली असता त्यात बियर, देशी दारू, विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. या कारवाईत दुचाकीसह ५४ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, जी.टी. बाचेवाड, रंजित आगळे, दिलावर खान, पिराजी निळे, संतोष सानप, सय्यद मोबीन यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अनधिकृतपणे दारूची वाहतूक, दोघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:43 IST