शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृतपणे दारूची वाहतूक, दोघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

परभणी : तालुक्यातील पेडगाव परिसरात अनधिकृतरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १२ जानेवारी रोजी ताब्यात ...

परभणी : तालुक्यातील पेडगाव परिसरात अनधिकृतरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १२ जानेवारी रोजी ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे सय्यद मोबीन सय्यद रहीम यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानुसार, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक मंगळवारी पेडगाव परिसरात गस्तीवर असताना, पाथरी रस्त्यावरील दंत महाविद्यालयाच्या परिसरात दोन व्यक्ती अनधिकृतपणे दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्या अधारे पथकाने दुचाकींच्या तपासणीस प्रारंभ केला. दुपारी ३.३०च्या सुमारास दोन व्यक्ती या रस्त्याने येत असल्याचे दिसून आले. दुचाकी थांबवून पथकाने चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे ओंकार शिंदे, धीरज वावळ असे सांगितले. यावेळी त्यांच्याकडील थैलीची तपासणी केली असता, त्यात बीयर, देशी दारू, विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. या कारवाईत दुचाकीसह ५४ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, जी.टी. बाचेवाड, रंजित आगळे, दिलावर खान, पिराजी निळे, संतोष सानप, सय्यद मोबीन यांच्या पथकाने ही कारवाई केली.