शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी दीड लाख पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

परभणी : पेट्रोल पंपावरील दिवसभराची रक्कम घेऊन घराकडे निघालेल्या एका कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पळविल्याची ...

परभणी : पेट्रोल पंपावरील दिवसभराची रक्कम घेऊन घराकडे निघालेल्या एका कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पळविल्याची घटना २१ जून रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

येथील शनिवार बाजार परिसरातील भिकुलाल पेट्रोलपंपावर अब्दुल सत्तार शेख नबी हे कर्मचारी आहेत. सोमवारी पेट्रोलपंपावर जमा झालेली दिवसभरातील रक्कम घेऊन अब्दुल सत्तार हे रात्रीच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. त्याच वेळी मोटारसायकलवर दोन चोरटे पेट्रोलपंपाच्या जवळ आले. या दोघांनी हिसका देऊन ही बॅग पळविली. त्यात दीड लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

शहरातील मध्यवस्तीत रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद

पेट्रोलपंपावर दीड लाख रुपयांची रक्कम पळवून नेल्याच्या प्रकरणातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी दोन पथक नियुक्त केले आहेत. चोरट्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली.