परभणी : एका महिला पोलीस कर्मचाऱ्यास लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
यासंदर्भात पीडित महिलेने नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीनुसार आरोपी पोलीस कर्मचारी शुभम सावंत याने लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केले. २०१७ पासून शुभम सावंत अत्याचार करीत होता. तसेच पहिले लग्न झालेले असताना पतीपासून फारकत घेण्यासही प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून शुभम सावंत याच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे तपास करीत आहेत. दरम्यान, आरोपी शुभम सावंत दोन महिन्यांपासून गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली.