शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

डीडीसाठी बँकांकडून टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST

स्टेट बँक ऑफ हैदराबादचे विलीनीकरण भारतीय स्टेट बँकेत केल्याने राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांची संख्या तीनवरून दोनवर आली. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्यादेखील ...

स्टेट बँक ऑफ हैदराबादचे विलीनीकरण भारतीय स्टेट बँकेत केल्याने राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांची संख्या तीनवरून दोनवर आली. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्यादेखील स्टेट बँकेत घटली. त्याचा फटका आता ग्राहकांना सोसावा लागतोय. सध्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेकडून डीडी काढला जात नाही. अत्यावश्यक कामही असले तरीही स्टेट बँकेकडून नकार दिला जातो. त्याचे कारण विचारल्यास खोटे बोलून ग्राहकांची शुद्ध फसवणूक केली जाते. सर्वाधिक खातेदार असलेल्या या बँकेची कृती अशोभनीय आहे. त्याची प्रचिती एस.आर. बने यांना दुसऱ्यांदा आली. त्यांनी ६ सप्टेंबरला स्टेट बँकेत डीडी काढला होता. तो वेळेत पोहोचेल, हा विश्वास फोल ठरला. परंतु १५ सप्टेंबरपर्यंत डीडी जमा झाला नाही. त्याची विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे बँकेकडून मिळाली. शासकीय नोकरीचा अर्ज भरण्यासाठी गेलेल्या अर्जदाराचे नातेवाईक सुधाकर हनवते यांनाही टोलवाटोलवी करण्यात आली. कर्मचाऱ्यांकडून-शाखाधिकाऱ्यांकडे आणि शाखाधिकाऱ्यांकडून-कर्मचाऱ्यांकडे त्यांना पाठविण्यात आले तरीही डीडी न देण्याचे कारण विचारल्यानंतर खुद्द शाखाधिकारी विजयकुमार वर्मा यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना विचारा, तेच सांगतील, असे म्हणून जबाबदारी झटकली. तत्पूर्वी केबिनचा दरवाजा बंद करून ते काम करत होते. ते खातेदारांना उत्तर देण्याचे दायित्व समजत नाहीत. हा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू असल्याचे ग्राहकांकडून ऐकण्यास मिळाले. दुसरीकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतही डीडी दिला जात नाही. त्याचे कारण प्रिंटर नसल्याचे सांगण्यात आले. प्रिंटरअभावी काढलेल्या डीडीची प्रिंट देता येत नाही म्हणून ग्रामीण बँकही डीडी टाळत आहेत. जर तालुक्यातील दोन्हीही ठिकाणी डीडी दिला जात नसल्याचे ग्राहकांवर राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखेवर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नाही. अनेक तक्रारी, विनंत्या, इशारे दिल्यानंतरही स्टेट बँकेच्या वर्तवणुकीत जराही फरक पडला नाही, हे विशेष.

आठ दिवसांनंतरही डिडी पोहचला नाही. त्याची विचारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांपर्यंत गर्दीमुळे जाता येत नाही. शाखाधिकारी तर दरवाजा बंद करून बसलेत. जेव्हापासून मागील शाखाधिकाऱ्यांची बदली झाली. तेव्हापासून भारतीय स्टेट बँकेत गोंधळ सुरू झाला आहे.

-एस. आर. बने, शिक्षक, पालम.

प्रिंटरअभावी डीडी काढणे बंद आहे. प्रिंटरची मागणी करण्यात आली आहे. तरीही अत्यावश्यकवेळी हस्तलिखीत डीडी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

-एस. एस. स्वामी, शाखाधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पालम.

डीडीबद्दल माझ्याऐवजी कर्मचाऱ्यांनाच विचारा ते सांगतील. डीडी काम तेच करतात.

- विजयकुमार वर्मा, शाखाधिकारी, भारतीय स्टेट बँक, पालम.