जोगवाडा येथील वसंता विठ्ठल सुरवसे हे १५ जुलै रोजी रात्री १ च्या सुमारास बाहेरगावाहून आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा शर्ट घरातील खुंटीला अडकवला व ते हातपाय धुऊन चहा घेत असताना त्यांच्या घराच्या छताकडे जाणारा दरवाजा उघडा दिसला. तसेच यावेळी आवाज आला. त्यामुळे त्यांनी छतावर जाऊन पाहिले असता अंधारात डिगांबर भगवान मस्के हा दबा धरून बसलेला दिसून आला. यावेळी पळत जाऊन सुरवसे यांनी मस्के याला पकडले. यावेळी आवाज ऐकून घरातील इतर व्यक्ती धावून आल्या. यावेळी चोरटा डिगांबर मस्के याची झडती घेतली असता त्याच्या जवळ सुरवसे यांच्या खिशातील २ हजार रुपये आढळून आले. यावेळी त्याने मला सोडा अन्यथा तुम्हाला खतम करून टाकतो, अशी धमकी दिली. माहिती मिळताच चारठाणा पोलीस गावात दाखल झाले. त्यांनी चोरट्यास ताब्यात घेतले. याबाबत वसंता सुरवसे यांनी पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दिली. त्यावरून डिगांबर मस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोगवाडा येथे चोरट्यास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST