देशातील २५ राज्यात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे एकाच वेळी आयोजन करण्यात आले होते. परभणी जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या ४८ खेळाडूंच्या ४ टीम करण्यात आल्या होत्या. त्यांना स्वतंत्र नावही देण्यात आले होते. पहिला सामना जुनेद खान टायगर विरुद्ध सुपर विनर्स यांच्यामध्ये झाला. या सामन्यांमध्ये जुनेद खान टायगर संघ विजयी होऊन अंतिम फेरीत पोहोचला. तसेच दुसरा बाद सामना रायझिंग स्टार विरुद्ध किंग्ज इलेव्हन यांच्यामध्ये झाला. या सामन्यांमध्ये रायझिंग स्टारने विजय संपादन करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यांमध्ये मात्र जुनेद खान टायगर संघाने रायझिंग स्टार संघाला चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात हरवून विजयश्री खेचून आणला. या स्पर्धेचा समारोप १० जानेवारी रोजी करण्यात आला. विजेत्या संघाला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जुनेद खान दुराणी यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक सय्यद मुक्तार अली, शेख जावेद यांची उपस्थिती होती. शेख मुजीब शेख रोफ यांनी प्रास्ताविक केले. वाहक पठाण यांनी सूत्रसंचालन केले. पंच म्हणून रब्बानी अन्सारी, संदीप सूत्रावे आदींनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी वाहक खान पठाण, शंकर धावरे, संदीप सुत्रवे, अन्सारी अब्दुल्ला, सय्यद जावेद, इक्बाल अन्सारी, वैजनाथ घुंबरे, अन्सारी कादरी, अरविंद जाधव, सय्यद मुस्तफा आदींनी प्रयत्न केले.