शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

काही हसले...काही हिरमुसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST

तहसील कार्यालयातील सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, गटविकास ...

तहसील कार्यालयातील सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, गटविकास अधिकारी विष्णू मोरे आदींच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्यातील १० गावांचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. ५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये निपाण टाकळी, आडगाव दराडे, राजा, लाडनांद्रा,कुपटा, पिंप्री गोंडगे, धनेगाव, राजवाडी, मोरेगाव, पिंप्री बु या गावांचा समावेश आहे. २२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. यात करडगाव, भांगापूर, डासाळा, हातनुर, बोरकिन्नी, सेलवाडी, गोमेवाकडी, वालूर, निरवाडी खु, रायपूर, डिग्रस बु,खु, करजखेडा तर राधेधामणगाव, हिस्सी, तिडी पिंपळगाव, खैरी, जवळा जिवाजी, काजळी रोहीणा, ब्राम्हणगाव प्र.प, पिंप्रुळा, नांदगाव, कुडा कोलदंडी या ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण महिलासाठी कान्हड, गिरगाव बु,चिकलठाणा बु, देऊळगाव, सिमणगाव, हादगाव खु, वाकी, वाई बोध, शिराळा, कन्हेरवाडी, गिरगाव खु, पिंपळगाव गोसावी, राजुरा, हट्टा, केमापूर, राव्हा, शिंदेटाकळी, बोरगाव जहागिर, खवणे पिंप्री, कुंडी, पिंप्री खु, ढेंगळी पिंपळगाव, गुळखंड आणि तळतुंबा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

राजा, आडगावमध्ये पेच

तालुक्यातील राजा आणि आडगाव दराडे या ग्रामपंचायतींची नुकतीच निवडणूक झाली. या दोन्ही गावात अनुसूचित जातीसाठी प्रभागात एक-एक जागा आहे. या ठिकाणी दोन्ही पुरूष निवडून आले आहेत. सोमवारी मात्र दोन्ही गावांच्या सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलांसाठी सुटले आहे. दोन्ही गावात महिला नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.