शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

येलदरी जलाशयाच्या परिसरात आढळला छोटा चोर कावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST

येलदरी धरणाच्या जलाशयात हवेत उडत असतांना नेहमीपेक्षा वेगळा पक्षी दिसला. भारतात या पक्ष्याच्या ई बर्डनुसार खूप कमी नोंदी आहेत. ...

येलदरी धरणाच्या जलाशयात हवेत उडत असतांना नेहमीपेक्षा वेगळा पक्षी दिसला. भारतात या पक्ष्याच्या ई बर्डनुसार खूप कमी नोंदी आहेत. मराठवाडयातील ही पहिलीच नोंद आहे. पक्षीमित्र, पक्षी अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाची नोंद आणि आनंदाचे वातावरण आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या तडख्यामुळे सुरक्षित ठिकाणी येलदरी धरणाच्या ठिकाणी आला असावा. याचे मराठी नाव छोटा चोर कावळा असून,

फ्रीगाटे बर्ड कुटुंबातील फ्रेगेटिडाईच्या कुळातील हा समुद्री पक्षी आहे. सुमारे ७५ सेमी (३० इंच) लांबीची, ही फ्रिगेटबर्डची सर्वात लहान प्रजाती आहे. हा पक्षी भारतीय आणि प्रशांत महासागराच्या तसेच ब्राझीलच्या अटलांटिक किनाऱ्‍यावरील उष्णकटिबंधीय वातावरणात वास्तव्यास असतो. छोटा चोर कावळा एक हलका अंगभूत समुद्री पक्षी आहे. ज्यात तपकिरी - काळा पिसारा, लांब अरुंद पंख आणि खोलवर काटेरी शेपटी असते. नरला एक लाल रंगाची सामान्य पिशवी असते आणि जोडीदारास आकर्षित करण्यासाठी तो त्यास फुगवितो. मादी नरपेक्षा किंचित मोठी आहे. फ्रिगेट बर्ड्स समुद्राच्या पृष्ठभागावरून अनेकदा उडणारे मासे खातात. नरांच्या वरच्या पंखांवर फिकट गुलाबी पट्टीदेखील असते. मादीचे केस, डोके आणि मान पांढरी कॉलर आणि स्तनाचे असते. मादीच्या डोळ्याभोवती एक लाल रंगाचे वलयही असते. किशोर आणि अपरिपक्व पक्ष्यांना ओळखणे अधिक कठीण आहे. फ्रिगेट पक्षी उडण्यासाठी तयार झालेले असावेत ते क्वचितच पोहतात आणि कमी चालत असतात. हे पक्षी झाडांमध्ये घरटे बांधतात. झाडे आणि झुडुपांभोवती सुरक्षित ठिकाणी पिल्लांचे संगोपन करतात. ते वजनाने अतिशय हलके आणि लांब, अरुंद पंख असलेले आणि ते हवेचे मास्टर आहेत.

मराठवाड्यातील पहिलीच नोंद

२१ मे रोजी सकाळी घराच्या पाठीमागे येलदरी धरणाच्या जलाशयात हवेत उडत असताना नेहमीपेक्षा वेगळा पक्षी दिसत असल्याचे समजले. त्यांनी त्वरित या पक्ष्याचे फोटो घेतले. या पक्ष्याची अधिक माहिती तपासली असता. भारतात या पक्ष्याच्या ई बर्डनुसार खूप कमी नोंदी आहेत. मराठवाडयातील ही पहिलीच नोंद असल्याचे गणेश कुरा यांनी सांगितले.

पक्षीमित्रांसाठी पर्वणी

महाराष्ट्रात या समुद्र पक्ष्याच्या ५ ते ६ नोंदी आहेत. तौक्ते वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासठी येलदरी जलाशयाच्या आवारात आला असावा. पक्षीमित्रांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. येलदरी धरण परिसरात नेहमीच नवनवीन पक्षी येत असल्याने पक्षीमित्रांसाठी ही पर्वणी ठरत आहे.

अनिल उरटवाड, पक्षीमित्र