शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी, भाजपत उमेदवारांची खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:43 IST

दलबदलू उमेदवारांचा दोन्ही पक्षांना फटका जिंतूर : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडली असून, ...

दलबदलू उमेदवारांचा दोन्ही पक्षांना फटका

जिंतूर : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडली असून, मागील वेळी एका पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आता मात्र दुसऱ्याच पक्षाकडून निवडणूक करीत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे

जिंतूर तालुक्यामध्ये १०१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. या निवडणुकीत अनेक उमेदवार हे आपला पक्ष सोडून इतर पक्षांच्या पॅनलमध्ये सामील झाले आहे. बोरीमध्ये राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. मागच्या वेळेस राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले तीन सदस्य चक्क भाजपच्या पॅनलकडून निवडणूक लढवित आहेत. शेख शेरू शेख वाजिद,अनंतराव श्रीरंगराव चौधरी,भास्कर कनकुटे हे तिघे राष्ट्रवादीकडून मागच्या वेळेस ग्रामपंचायत सदस्य यावेळेस भाजपच्या पॅनलकडून निवडणूक लढवित आहेत. सावंगी माळसा ग्रामपंचायतीत बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक माजी सभापती सुंदरराव चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे प्रमुख बनवून माजी आ. विजय भांबळे यांनी बोर्डीकर गटाला जोरदार धक्का दिला आहे, तर याच ठिकाणी भांबळे यांचे कट्टर समर्थक माजी जि.प. सदस्य विजयकुमार

वाकळे यांनी भाजपच्या पॅनलमध्ये समाविष्ट होऊन भांबळे यांना धक्का दिला आहे. चारठाणा येथेही दलबदलूची प्रचंड संख्या आहे. विजय भांबळे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेले नानासाहेब राऊत यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे, तर एकेकाळी बोर्डीकर यांचे समर्थक असणारे माजी सरपंच बी. जी. चव्हाण हे आता राष्ट्रवादीचे पॅनल करून निवडणूक लढवित आहेत. याठिकाणी अनेकजण या पक्षातून त्या पक्षात जाऊन नशीब आजमावत आहेत.

काँग्रेसला मिळाले नाहीत उमेदवार

बोरी ग्रामपंचायतीमध्ये प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागसेन भेरजे यांना पॅनलसाठी उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत. केवळ दोन जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. शिवाय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप चव्हाण यांच्या भावजय दीपा संदीप चव्हाण या सावंगा म्हाळसा येथून भाजपच्या पॅनलकडून निवडणूक लढवित आहेत. तालुक्यामध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे.