देवगाव फाटा : विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्काराची जडणघडण ही शाळेत होते. यातूनच विद्यार्थ्यांचे भावी जीवनमान सुखदायक होते, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी यांनी केले आहे .
सेलू येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील शिष्यवृत्तिधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चौधरी बोलत होते. प्रमुख पाहुणे ब्रिजगोपालजी काबरा, सर्वेश काबरा, महेश काबरा, किरणराव डुघरेकर, सुधीरराव चौधरी, मुख्याध्यापक अप्पाराव यादव यांची उपस्थिती होती.
हरिभाऊ चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या गुणांना व कलांना शाळा प्रोत्साहित करते. शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळेच यश प्राप्त होते. मान्यवरांच्या हस्ते वरद मुकुंद बरकुले, विकास मारुती घुगे, पवन भीमराव शिंदे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजय चौधरी, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अभिषेक राजूरकर, पद्यसीमा आष्टीकर यांनी केले. आभार गजानन साळवे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रागिणी जकाते, दीपाली भावसार, शंकर राऊत, विनोद मंडलिक ,चक्रधर वाघमारे, दत्ता गिरी, दिगंबर खुळे, संजीवनी रामपूरकर आदींनी प्रयत्न केले.