कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शनची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यावरून अन्न व औषध प्रशासन, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या ७ एप्रिल रोजी रात्री बसस्थानक परिसरातील हाके मेडिकल या औषधी दुकानावर कारवाई केली. उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, अन्न व औषध प्रशासनाचे बळीराम मरेवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी औषधी विक्रेत्याकडे या इंजेक्शनचे बिल उपलब्ध नव्हते. ४ हजार ८०० रुपये किमतीचे इंजेक्शन ६ हजार रुपयांपर्यंत विक्री केले जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी औषध निरीक्षक बळीराम मरेवाड यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात विजय मुकुंदराव हाके व दुकानावरील कर्मचारी रवी प्रभाकर ईघारे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर तट तपास करीत आहेत.
रेमडेसिवीरची जादा दराने विक्री; दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:17 IST