शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदे भरण्याची मागणी करत ‘महसूल’चे कामबंद; परभणीत ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग

By मारोती जुंबडे | Updated: July 15, 2024 18:04 IST

महसूल विभागातील ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावरच त्याचा मोठा परिणाम दिसून येतो.

परभणी: महसूल विभागातील ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. तसेच आकृतीबंध मंजूर न झाल्यामुळे रिक्त पदे भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावरही परिणाम होत असल्याने ही पदे तत्काळ भरण्यासाठी जिल्ह्यातील कोतवालासह अव्वल कारकुन असे एकूण ७०० कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे महसूलची कामे खोंळबली आहेत. 

महसूल विभागातील ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावरच त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. त्यातच आता राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. त्यामुळे नायब तहसीलदारांसह उपलेखपालपर्यंत नवीन पद भरती करून या योजनेचे काम त्यांच्यावर सोपवावे अशी मागणी परभणी जिल्हा गट क महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र तोडगा निघाला नसल्याने १५ जुलै सकाळी ११ वाजल्यापासून महसूल कर्मचारी संघटनाच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे नानासाहेब भेंडेकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे, पंचशिल करुणा बगाटे, विठ्ठल मोरे, वैजनाथ फड याचबरोबर कोतवालासह अव्वल कारकुनापर्यंत ७०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या कामावर परिणाममहसूल विभागातील जिल्ह्यातील जवळपास सातशे कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या कामावर परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासन व शासनाने या संपावर तोडगा काढून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत होईल या अनुषंगाने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभागState Governmentराज्य सरकार