शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत शिक्षकांवर लगाम

By admin | Updated: November 11, 2014 15:40 IST

जिल्हा परिषदेत फिरणार्‍या शिक्षकांची संख्या लक्षात घेता जि.प. त येणार्‍या शिक्षकांना आता कामाच्या स्वरूपाची नोंद करावी लागणार आहे. शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

नांदेड : जिल्हा परिषदेत फिरणार्‍या शिक्षकांची संख्या लक्षात घेता जि.प. त येणार्‍या शिक्षकांना आता कामाच्या स्वरूपाची नोंद करावी लागणार आहे. शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत.जिल्हा परिषदेत शिक्षकांची चलती नव्या पदाधिकार्‍यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. बोगस बदली प्रकरणानंतर या शिक्षकांना आपल्यापासून लांब ठेवण्याची काळजी पदाधिकार्‍यांनी घेतली आहे. शिक्षक पीए ठेवण्याबाबतही नव्या पदाधिकार्‍यांनी काळजी घेतली आहे. शिक्षण सभापती बेळगे यांनी जिल्हा परिषदेत येणार्‍या शिक्षकांना आपल्या कामाची नोंद प्रशासनाकडे करण्याचे आदेश दिले आहेत. अशीच पद्धत आरोग्य विभागातही गेल्या दोन महिन्यांपासून राबविली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी रूजू होताच मुख्यालय सोडून जिल्हा परिषदेत विनाकारण आरोग्य कर्मचार्‍यांवर आळा घातला होता. दरम्यान, बोगस बदली प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केलेल्या कारवाईचे शिक्षण सभापती बेळगे यांनी सर्मथन केले आहे. प्रशासनाने केलेली कारवाई योग्यच असून शिक्षण विभागातील अनागोंदीला आळा घालण्यास आपण प्राथमिकता देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे असेही ते म्हणाले.