शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST

रेल्वे गाड्यांना वाढली प्रवासी संख्या परभणी : नांदेड - मनमाड या मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढली असून, हळूहळू रेल्वेने ...

रेल्वे गाड्यांना वाढली प्रवासी संख्या

परभणी : नांदेड - मनमाड या मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढली असून, हळूहळू रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. आरक्षण करुनच प्रवाशांना रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे स्थानकावर आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

ग्रामस्थांना विकासकामांची प्रतीक्षा

परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील विकासकामे ठप्प होती. आता आचारसंहिता शिथील झाल्याने ग्रामस्थांना विकासकामांची प्रतीक्षा लागली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. या कामासाठी निधी मंजूर करुन कामे सुरू करावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

जलकुंभ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

परभणी : येथील अमेय नगर भागात जलकुंभ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जलकुंभावर स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, येत्या महिनाभरात जलकुंभाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सध्या येथील पाणीपुरवठा विस्कळीत आहे.

कचरा संकलनात मोठी वाढ

परभणी : शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत मनपाकडून घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन केले जात आहे. प्रभागांमध्ये दररोज दोनवेळा घंटागाडी फिरवली जात असून, सुमारे १३० टन कचरा दररोज संकलित केला जात आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या बऱ्याच अंशी मिटली आहे.

वाळूचा अवैध उपसा सुरुच

परभणी : जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव अद्याप झाले नसून, नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. महसूल प्रशासन आणि पोलीस अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत असले तरी अजूनही वाळू उपसा थांबलेला नाही. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात वाढले ऊसाचे क्षेत्र

परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असून, शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असून, ग्रामीण भागात ऊस तोडणीला वेग आला आहे.