शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

महसूल प्रशासनाच्या जागेवरील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST

गंगाखेड शहरातील अहिल्याबाई होळकर चौक परिसरात असलेल्या तलाठी भवनच्या शेजारील सर्व्हे नंबर २४८ मधील महसूल प्रशासनाच्या मोकळ्या जागेवर हॉटेल, ...

गंगाखेड शहरातील अहिल्याबाई होळकर चौक परिसरात असलेल्या तलाठी भवनच्या शेजारील सर्व्हे नंबर २४८ मधील महसूल प्रशासनाच्या मोकळ्या जागेवर हॉटेल, पानटपरी, चप्पल, बूट, जनरल स्टोअर्स, फोटो स्टुडिओ आदी दुकान चालकांनी अतिक्रमण केले होते. महसूल प्रशासनाच्या जागेवर झालेले अतिक्रमण २४ तासांच्या आत स्वतःहून काढून घ्यावे, अशा सूचना २९ जानेवारी रोजी अतिक्रमण धारकांना देण्यात आल्या होत्या. यातील बहुतांश दुकानदारांनी ३० जानेवारी रोजीच्या रात्री अतिक्रमण काढून घेतले. नगरपालिका, तहसील व पोलीस प्रशासनाच्यावतीने ३१ जानेवारी रोजी केलेल्या संयुक्त कार्यवाहीत सकाळी ७ ते १० च्या सुमारास उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गोविंद खोडवे, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, उपमुख्याधिकारी स्वाती वाकडे, वसंत वाडकर, मंडळ अधिकारी शंकरराव राठोड, तलाठी चंद्रकांत साळवे, दत्तराव बिलापट्टे आदींच्या उपस्थितीत उर्वरित दुकानदारांचे अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

शहरातील मुख्य रस्तावरील अतिक्रमण काढा

महसूल प्रशासनाच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढले. त्याचप्रमाणे शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी झालेल्या पान टपरी, दुकानांसमोरील ओटे, रस्त्यावर ठेवलेल्या सामानाच्या अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळे निर्माण होत असल्याने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणही काढून शहरातील रस्ते रहदारीसाठी मोकळे करावेत अशी मागणी शहरवासीयांतून केली जात आहे.