शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बावीसशे रुपयांनाच मिळणार रेमडेसिविर इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST

परभणी : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर हे इंजेक्शन २ हजार २०० रुपयांनाच उपलब्ध करून दिले जाणार ...

परभणी : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर हे इंजेक्शन २ हजार २०० रुपयांनाच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचा निर्णय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन समवेत झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांना रेमेडेसिविर इंजेक्शन द्यावे लागते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या इंजेक्शनची मागणी झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध होत नव्हते. या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी चढ्या भावाने इंजेक्शनची विक्री होत होती. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा उपलब्ध साठा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्ह्यातील औषध विक्रेते संघटनेचे पदाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत रेमडेसिविर इंजेक्शनबाबत आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या महामारीत रेमडेसिविर इंजेक्शन जिल्‍ह्यातील रुग्‍णांना २ हजार २०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापुढे रेमडेसिविर इंजेक्शन २ हजार २०० रुपयांना मिळेल, याची सर्व रुग्णांच्या नातेवाईकांनी खात्री करून घ्यावी, असे आवाहन परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री आणि सचिव सूर्यकांत हाके यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पार पडलेल्या या बैठकीला अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मरेवाड, औषध विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके, पवन झांजरी, अनिल हराळ, सुनील जोशी आदी उपस्थित होते.