शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित रुग्णवाढ लक्षात घेऊन मिळणार रेमडेसिवीर इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भात ९ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचे राज्यस्तरावरून ...

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भात ९ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचे राज्यस्तरावरून वाटप करताना रुग्णालयनिहाय व रुग्णांची संख्या विचारात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. या सूत्रानुसार परभणी जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत १८ हजार ९९८ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या होण्याची शक्यता गृहीत धरून या रुग्णांच्या १५ टक्क्यांप्रमाणे २ हजार ७३० इंजेक्शनचा साठा जिल्ह्याला प्रस्तावित केला आहे. रुग्णालयांमध्ये दाखल एकूण रुग्णसंख्येऐवजी सक्रिय रुग्णसंख्या वाढीचा १० टक्के दर विचारात घेऊन जिल्हानिहाय रेमडेसिवीरचे वितरण करण्यात येणार आहे. उपलब्ध झालेल्या रेमडेसिवीरपैकी दहा टक्के साठा आपत्कालीन साठा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत ठेवावा, इंजेक्शन वितरकांनी ३० एप्रिलपर्यंत सक्रिय रुग्णवाढ विचारात घेऊन संबंधित कंपनीकडून मागणी करून ठेवणे आवश्यक आहे, असे निर्देश राज्याचे अवर सचिव हेमंत महाजन यांनी दिले आहेत.