ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांचा भास्कर पेरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालम येथे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ७ फेब्रुवारी रोजी आ. रत्नाकर गुट्टे यांच्या परळी रस्त्यावरील निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत आ. गुट्टे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख चांद, शहर उपाध्यक्ष शेख खालेद आदी पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य मुस्लीम कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष व आ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात प्रवेश केला. यावेळी जि. प. सदस्य किशनराव भोसले, ॲड. संदीप अळनुरे, बालासाहेब निरस, माधवराव गायकवाड, पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव मुंडे, नितीन बडे, कृष्णा सोळंके, हनुमंत मुंडे, नगरसेवक सत्यपाल साळवे, अजीम शेख, राधाकिशन शिंदे, असद पठाण, गौस चाऊस, सय्यद चांद, राजू खान, एकबाल चाऊस, मगर पोले, शिवा पवार, महेश शेटे आदी उपस्थित होते.