शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

५५ वाळूघाटांच्या लिलावासाठी प्रस्ताव

By admin | Updated: November 11, 2014 15:48 IST

ग्रामसभेचा ठराव, तलाठय़ाचा अहवाल, अपेक्षित क्षेत्र यावरून घाटाची निवड केली जाते. त्यावर जिल्हा भूवैज्ञानिक खात्याचा अभिप्राय घेतला जातो.

ग्रामसभेचा ठराव, तलाठय़ाचा अहवाल, अपेक्षित क्षेत्र यावरून घाटाची निवड केली जाते. त्यावर जिल्हा भूवैज्ञानिक खात्याचा अभिप्राय घेतला जातो. तो नकारात्मक असल्यास घाट बाद केला जातो. हिंगोली : /जिल्ह्यातील /९२ पैकी ५५ वाळूघाटांच्या वाळू उपशासाठी लिलावाची परवानगी मागणारा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून आणखी ३७ घाटांसाठी प्रक्रिया सुरू आहे.गतवर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यानंतरही जवळपास ४१ घाटांनाच मंजुरी मिळाली होती. यातून प्रशासनाला २ कोटी ८८ लाख ६७ हजार ३३४ रुपयांचा महसूल मिळाला होता. त्याचबरोबर अवैध उत्खनन, साठवणूक, अवैध वाहतूक आदी प्रकारातून जवळपास १५ लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. यावर्षी निवडणुकीमुळे सर्वच जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया विलंबाने सुरू झाली आहे. साधारणपणे सप्टेंबरअखेरपासून ती सुरू होती. यंदा ९२ वाळूघाटांपैकी ५५ घाटांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. तर आणखी ३७ घाटांची प्रक्रिया सुरू आहे. यंदा झालेले अल्पपर्जन्यमान तसेच मागीलवेळी झालेले उत्खनन आदी कारणांमुळे या घाटांची फेरतपासणी करण्यात येत आहे. यंदा मोठा पूर न आल्याचा परिणाम अनेक घाटांवर झाला आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेत काही मंडळी गावातीलच काम असल्याचे सांगून उत्खनन करू लागली आहे.आगामी आठवडाभरात जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया प्रारंभ होईल, अशी शक्यता जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी व्यक्त केली. शिवाय उर्वरित ३७ घाटांसाठीचे प्रस्तावही आगामी दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील. /(जिल्हा प्रतिनिधी)